पालखेड कालव्याच्या वितरीका क्र. ४६ ते ५२ ला पाणी आल्याने शेतकरी आनंदात बाबा डमाळे यांच्या हस्ते ठिकठिकाणी जलपूजन

 

 

पालखेड कालव्याच्या वितरीका क्र. ४६ ते ५२ ला पाणी आल्याने शेतकरी आनंदात

बाबा डमाळे यांच्या  हस्ते ठिकठिकाणी जलपूजन

 येवला - प्रतिनिधी
तालुक्यात पाऊस कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी खरीपाची पिके करपायला लागले होते. त्यामुळे या परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली होती. पालखेड लाभक्षेत्रातील चारी क्रमांक ४६ ते ५२ ला जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून भाजपा नेते बाबा डमाळे यांनी पाणी मिळवून दिले.  अंदरसूल परिसरामध्ये काल पाण्याचे आगमन होताच शेतकर्‍यांनी मोठा आनंदोत्सव साजरा करत बाबा डमाळे यांच्या हस्ते ठिकठिकाणी जलपूजन करवुन घेतले.
यंदा पाऊस कमी असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. पालखेड कालव्याच्या धरणाच्या परिसरातही पाऊस कमी प्रमाणात आहे. त्यामुळे जलसाठाही कमी असल्यामुळे जिल्हाधिकारी व संबधित अधिकारी यांनी वितरीका ४६ ते ५२ ला पाणी देण्याची असमर्थता दर्शविली होती. या पाण्याकरीता अनेकांनी मागण्या केल्या होत्या. मात्र, बाबा डमाळे यांनी शिष्ट मंडळाला बरोबर घेत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या मुंबईस्थित शिवनेरी निवासस्थानावर जाऊन पाण्यासाठी आग्रह धरला. आत्ता पाणी मिळाले नाही तर पिके तर जाऊद्या जनावरे व पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होईल. त्यामुळे ना. महाजन यांच्याकडे त्यांनी पाण्याचा हट्ट धरला. त्यानुसार पालकमंत्र्यांनी  संबंधित अधिकार्‍यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले.
काल अंदरसूल परिसरामध्ये पाण्याचे आगमन होताच शेतकर्‍यांमध्ये मोठा आनंदोत्सव संचारला. शेतकर्‍यांनी स्वयंस्फुर्तीने भाजपा नेते बाबा डमाळे यांचे जय्यत स्वागत करुन त्यांच्या हस्ते अंदरसूल, पेटीपूल, मन्याडथडी, गवंडगाव, सुरेगाव येथे जलपूजन करुन घेतले. याप्रसंगी अमोल सोनवणे, संतोष केंद्रे, बाबा सोनवणे, कमळकर देशमुख, नारायणराव देशमुख, संजय ढोले, कचरु गवळी, अण्णासाहेब ढोले, जगदिश गायकवाड, रामुदादा भागवत, आप्पासाहेब भागवत, संजय भागवत, प्रकाश बजाज, बन्टी एंडाईत, भगवान जाधव, रामनाथ घोडके, भारत देशमुख, शंकर गायकवाड, हरिभाऊ साळुंखे, संतोष सोनवणे, संदीप वडाळकर, रतन जाधव, राजु सोनवणे, सुनील सोनवणे, गोरख जाधव, बाळासाहेब देशमुख, ज्ञानेश्‍वर जोंधळे, ताराचंद भागवत, नाना वडाळकर, कचरु भागवत, भाऊराव भागवत, बाळासाहेब भागवत, अविनाश भागवत, सुभाष भागवत, रवी भागवत, संदीप वडाळकर, त्र्यंबक गोरे, भाऊसाहेब दळे, संतोष जाधव, साखरचंद गांजे, सुभाष वाघचौरे, भाऊसाहेब बागल आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने