महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा येवला भूमीतील मानव मुक्ती उदगार जगाला प्रेरणादायी:-लोकशाहीर संभाजी भगत लोकशाहीर संभाजी भगत यांची मुक्तीभूमीला भेट

 

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा येवला भूमीतील मानव मुक्ती उदगार जगाला प्रेरणादायी:-लोकशाहीर संभाजी भगत
लोकशाहीर संभाजी भगत यांची मुक्तीभूमीला भेट

येवला : प्रतिनिधी

 मानवी जीवन अधर्म,परंपरा,अनिष्टरुढी-चाली परंपरा व अविवेक उध्वस्त करतो मन मुक्ती हा मानवी जीवन उद्धाराचा आरंभ असून जो धर्म मानवाला परिवर्तनशील-गतिशील ठेवत नाही स्वतःच्या धडावर स्वतःचा मेंदू ठेवत नाही तो माणूस पहिला मानसिक मग आर्थिक,राजकीय, सांस्कृतिक गुलाम बनतो असा मेंदू गुलाम करणारा विचार धर्म व रिती माणसाचा कधीच उद्धार करू शकत नाही म्हणून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा येवला भूमीतील मानव मुक्ती उदगार केवळ भारतीयांना नाही तर जगातील तमाम प्रकारच्या गुलामांना हर एक प्रकारच्या गुलामीतून मुक्त होण्याची प्रेरणा देतो असे उदगार सुप्रसिद्ध विद्रोही लोकशाहीर संभाजी भगत यांनी काढले.
 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारक -मुक्तीभूमी येवला येथे लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान,समता प्रतिष्ठान यांच्या वतीने त्यांच्या हस्ते बोधीवृक्षा रोपण करण्यात आले व लोककवी वामनदादा कर्डक यांच्या गीताचा संग्रह (आंबेडकरवादी गझल वेध,संग्राम पिटक संपादक प्रा.शरद शेजवळ,प्रमोद वाळके) त्यांना मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आला.
 ह्या वेळी प्रा.अर्जुन जाधव,ऍड.शहाजी शिंदे,प्रा.अर्जुन कोकाटे,प्रा.शरद शेजवळ,गोपाळ पाटील,मुक्तीभूमी व्याख्यान मालेच्या वतीने  सुनील खरे,शंकर जाधव , संतोष घोडेराव , गोरख घुसळे,  रविराज गोतिस, बापूसाहेब वाघ व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र पगारे, विजय घोडेराव ,यांनी स्वागत केले,
यावेळी मुक्तीभूमि व्यवस्थापनचे कर्मचारी भगवान साबळे,  पंचम साळवे, अशोक साळवे इ.उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने