न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
येवला . प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम जी पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात भारताचा ७२वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती माननीय श्री संभाजीराजे पवार,एल आय सी चे विकास अधिकारी माननीय श्री दौलत रावजी ठाकरे, सावरगावचे सरपंच माननीय श्री पवार सोपान, भारतीय सैन्य दलातील जवान श्री संदीप काटे, ग्रामसेवक श्री शेलार भाऊसाहेब,श्री कचेश्वर काटेे,श्री दिनकर पवार, सावरगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री अहिरराव डी डी सर, विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री एस आर पैठणकर सर उपस्थित होते.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
ध्वजारोहण माननीय श्री संभाजी राजे पवार यांच्या हस्ते झाले.स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शिक्षण प्रसारक मंडळ नगरसूल संस्थेचे जनरल सेक्रेटरी माननीय श्री प्रमोददादा पाटील व संस्थेचे सहसचिव माननीय श्री प्रवीण दादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गाणे सादर केलेत, त्यासाठी सांस्कृतिक प्रमुख *श्री ढोमसे एस सी* सरांचे मार्गदर्शन लाभले तसेच विद्यार्थ्यांनी सामुदायिक कवायत प्रकार केलेत.त्यासाठी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक *श्री एस एम घुगे* सर तसेच *बी एच सोनवणे* सरांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक *श्री ढोमसे एच सी* सरांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *श्री विंचु सरांनी* केले.तसेच अतिथींचे आभार प्रकटन *श्री नागरे जी एस सरांनी* केले. सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी *सौ ढोमसे मॅडम,श्री भाटे सर,श्री मोरे सर,श्री दाभाडे सर,श्री पगार सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे* मोलाचे सहकार्य लाभले.