तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग






तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग 

जिल्हा स्पर्धेसाठी येवला तालुका संघाची निवड 

येवला : प्रतिनिधी

       शहरातील कै. भाऊलाल पहिलवान लोणारी क्रीडा संकुलात सोमवारी संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत शहर व तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग दिसून आला.फ्रि-स्टाईल व ग्रिको रोमणमधील विविध वजनगटात खेळविल्या गेलेल्या या कुस्ती स्पर्धेत मुलांनी अनेक डावांचे दर्शन घडवले.शालेय मुली देखील या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.शाळकरी मुलांनी यावेळी प्रेक्षणीय कुस्त्या करत वाहवा मिळवली.१४,१७ तसेच १९ वर्ष वयोगटातील अनेक वजनी वजन गटात घेतल्या गेलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पालिका मुख्याधिकारी संगिता नांदुरकर ,नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर,पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी,माजी नगराध्यक्षा श्रीमती सुंदरबाई लोणारी,बाजार समितीचे माजी सभापती अरुण काळे,उपमहाराष्ट्र केसरी पैलवान राजेंद्र लोणारी,नगरसेवक दयानंद जावळे,कला व वाणिज्य महाविदयालयाचे उपप्राचार्य प्रा. शिरीष नांदुर्डीकर,माजी नगरसेवक तथा क्रीडा शिक्षक सागर लोणारी,भगिरथ गायकवाड (सर), गंगाधर लोणारी,स्पर्धेचे तालुका संयोजक तथा क्रीडा शिक्षक नवनाथ उंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.पाच तासांच्यावर हि स्पर्धा चालली.       
निकाल असे - फ्रि-स्टाईल मुले १४ वर्षांखालील : ३२ किलो – रोहित गायकवाड (जनता,पाटोदा), ३५ किलो – फैजान शेख (जनता,येवला),३८ किलो – संस्कार लोणारी (डी. पॉल,येवला),४१ किलो – धनंजय पाटील (स्वामी विवेकानंद,एरंडगाव), ४५ किलो – नितीन लोखंडे (मुक्तानंद,येवला), ४९ किलो- कुणाल परदेशी (एन्झोकेम, येवला), ५५ किलो – प्रविण शिंदे (जनता,पाटोदा), ६० किलो – फैज शेख (एन्झोकेम, येवला), ग्रीको रोमण मुळे १७ वर्षांखालील : ४६ किलो – महेंद्र शेलार, ५० किलो – रुद्र क्षिरसागर (एन्झोकेम, येवला), ६९ किलो – इंद्रजित लोणारी, ८५ किलो – विश्वजित लोणारी (डी. पॉल.येवला).फ्रि-स्टाईल मुले १७ वर्षांखालील: ४२ किलो – हौशान अन्सारी (जनता,येवला),४६ किलो- इमाद शेख (मुक्तानंद मेडीयम, येवला),५० किलो - आकाश शिंदे (जनता, येवला),५४ किलो – विकास गाढे (स्वामी विवेकानंद,एरंडगाव),५८ किलो – राहुल पगारे (माध्य. विदयालय,राजापूर),६९ किलो – गौरव चव्हाण (मुक्तानंद उच्च, येवला),८५ किलो – प्रथमेश काबरा (मुक्तानंद इंग्लिश,येवला).ग्रीको रोमण मुले १९ वर्षांखालील : ५५ किलो – कृष्णा परदेशी,६० किलो – दिगंबर वाघ, ८४ किलो – चेतन बेलदार (एन्झोकेम,येवला).फ्रि-स्टाईल मुले १९ वर्षांखालील मुले : ४६ किलो – अतुल मोरे (न्यु इंग्लिश स्कूल,नगरसूल), ५० किलो- जुबेद शेख (अंग्लो उर्दू, येवला), ५५ किलो – प्रितेश रोठे (एन्झोकेम, येवला), ६० किलो – अमोल शिंदे (न्यु इंग्लिश,नगरसूल), ६६ किलो – तुषार साताळकर (मुक्तानंद, येवला), ७४ किलो – वैभव भोसले, ८४ किलो प्रकाश बिडगर (न्यु इंग्लिश, नगरसूल),९६ किलो – प्रविण पवार (संतोष माध्यमिक,बाभुळगाव). 
   मुली : फ्रि-स्टाईल १४ वर्षांखालील : ३८ किलो – ऋतुजा गाढे (जनता विदयालय,जळगाव नेऊर), ४४ किलो – साक्षी लोणारी (एन्झोकेम,येवला).४८ किलो – साक्षी डांगळे (जनता, पाटोदा).फ्रि-स्टाईल १७ वर्षांखालील  : ४० किलो – शितल सोनवणे (रहाडी), ४३ किलो- गायत्री शिंदे, ४६ किलो – पूजा वऱ्हे (जनता,जळगाव नेऊर),४९ किलो – लक्ष्मी गायकवाड (जनता,पाटोदा).फ्रि-स्टाईल १९ वर्षांखालील  : ४४ किलो – गायत्री सोनवणे (जनता,पाटोदा), ५१ किलो – वर्षा भड (स्वामी मुक्तानंद, येवला),५५ किलो – प्रज्वल (संतोष, रहाडी),५९ किलो – रुशाली सानप (न्यु इंग्लिश,नगरसूल).   
    स्पर्धेचे पंच म्हणून उपमहाराष्ट्र केसरी पैलवान राजेंद्र लोणारी,महाराष्ट्र चम्पियन विजय लोणारी,रोहन लोणारी,क्रीडा शिक्षक सागर लोणारी,रोहन परदेशी,निखील सांबर,मंगेश शेलार,लक्ष्मण गवळी,मन्ना वाडेकर,प्रविण लोणारी आदींनी काम पहिले.क्रीडा शिक्षक सोनवणे,सानप,अरुण गायकवाड,विजय क्षिरसागर,परदेशी,विजय आहिरराव,ठोंबरे,सचिन पगारे,मुटेकर,आर. ए. गायकवाड,सचिन अहिरे,बोरनारे,गाजरे,कुणाल भावसार,सचिन चांगगळे, कुऱ्हाडे आदींची यावेळी उपस्थिती होती.    

थोडे नवीन जरा जुने