येवल्यात मंगळवार ६ फेब्रू.ला शासकिय तुरखरेदीला प्रारंभ......


येवल्यात मंगळवार ६ फेब्रू.ला शासकिय तुरखरेदीला प्रारंभ......

येवला - प्रतिनिधी
                         
 नाशिक जिल्ह्यात राज्य शासनाने सटाणा, येवला , मालेगाव नांदगाव अशी चार खरेदी केंद्र सुरू करण्याची मान्यता दिली असुन नाशिक जिल्हयात आजपावेतो २०२शेतक-यांनी तुरीची ऑनलाईन नोंदणी केली असुन यापैकी ११० तूर नोंदणी धारक शेतकरी हे येवला तालुक्यातील आहे. नविन पोते शिलाई यंत्र , वाढिव अवास्तव कामे व शासनाकडून मागील वर्षाचे तुर खरेदिचे रखडलेले जिल्ह्यातील खरेदी विक्री संघाचे कमिशन यामुळे जिल्हयात तूर खरेदी केंद्रे सुरू करण्यास फारसा उत्साह नसला तरी येवला तालूक्यातील तूर उत्पादक शेतकरी हितासाठी मंगळवार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता खरेदी विक्री संघ कार्यालय मार्केट यार्ड येवला ,येथे शासकिय तूर खरेदी योजनेचा शुभारंभ होणार असल्याचे माहिती येवला तालूका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भागुनाथ उशीर यांनी दिली आहे.

ऑनलाईन तूर नोंदणीसाठी तालूक्यात अल्प प्रतिसाद मिळाल्याने तालूका खरेदी विक्री संघाच्या वतीने अंदरसुल, नगरसुल, मुखेड,पाटोदा, राजापूर या पाचही जि.प. गटात तूर ऑनलाईन नोंदणी शिबिर आयोजित करुन जनजागृती केली आहे.तुरीसाठी आधारभूत किंमत ५४५० रुपये प्रति क्विंटल असुन एकरी ५ क्विंटल प्रमाणे मोजमाप करण्याचे मार्केटिंग फेडरेशन करुन निर्देश आहे.
 नाशिक जिल्हयाला १७५०० क्विंटल तूर खरेदीचे उदिष्ठ् शासनाने दिल्याने तालूक्यातील तुर उत्पादक शेतकऱ्यांनी प्राथमिकतेने ऑनलाईन तुर नोंदणी करून माल विक्रीस आणावा असे आवाहान संस्थेचे उपाध्यक्ष नाना शेळके, व्यवस्थापक बाबा जाधव व सर्व संचालक मंडळाने दिली आहे.


 एकरी ५ क्विंटल प्रमाणे तूर खरेदीचे आदेश असले तरी ही मर्यादा एकरी १० क्विंटल करणे कामी संघामार्फत पाठपुरावा करू . -- दत्ता आहेर , *संचालक : खरेदी विक्री संघ येवला
थोडे नवीन जरा जुने