अनकाईला मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या ५७ लाखांच्या योजनेला सरपंचांच्या हस्ते झाला शुभारंभ

 


 


अनकाईला मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या ५७ लाखांच्या योजनेला सरपंचांच्या हस्ते झाला शुभारंभ

 

येवला  : प्रतिनिधी


अनकाई येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नव्याने मुख्यमंत्री पेयजल योजनेतून ५७ लाख रुपये किमतीची नवी योजना मंजूर झाली आहे.या कामाचा शुभारंभ शुक्रवारी झाला.

या गावाला असलेली योजना पाण्याअभावी कुचकामी ठरली आहे. हास्यास्पद म्हणजे अडोतीस गाव पाणीपुरवठा योजनेची पाण्याची साठवण टाकी या गावात असूनही योजनेचे पाणी मात्र गावाला देण्यात आलेले नाही.यामुळे गाव टँकरग्रस्त असून टंचाईच्या साडेसातीत अडकलेलेच आहे.

यामुळे गावाची तहान भागवण्यासाठी ५७ लाख रुपये खर्चून येथे नव्याने विहीर,पाइपलाइन व टाकी साकारली जाणार आहे. येथील सरोवर भागात या टाकीच्या कामाचा शुभारंभ सरपंच प्रतिभा वैद्य यांच्या हस्ते नुकताच श्रीफळ वाढवून करण्यात आला आहे.या योजनेच्या विहिरीला कायमस्वरूपी पाणी उपलब्ध झाल्यास गावाची टंचाईतून कायमची सुटका होणार असल्याचे यावेळी बाजार समितीचे माजी सभापती डॉ. सुधीर जाधव यांनी सांगितले. यावेळी सरपंच वैद्य,ज्येष्ठ नेते बाबूशेठ कासलीवाल,सोसायटीचे अध्यक्ष गणपत देवकर,आनंदा वैद्य,संतोष वैद्य,राजू नंदाळे,

नगीनाबाई कासलीवाल,बाळू आहिरे, संजय वैद्य,किसन व्यापारी,माजी सभापती शोभा जाधव,किरण जाधव,

बाळकृष्ण सोनवणे,विलास आहिरे,सुनील देवकर,भावराव सोनवणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

"अनकाई गाव परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते.मात्र गावाला पिण्याच्या पाण्यासाठी नेहमी हाल सहन करावी लागली आहे.३८ गाव योजनते समावेश करावा या आमच्या मागणीची दखल झाली असती तर आमचा प्रश्न कायमाचा मिटला असता.आता मुख्यमंत्री पेयजल योजनेचा आधार गावाला मिळणार आहे."

डॉ. सुधीर जाधव,माजी सरपंच,अनकाई

 


 
 
 


थोडे नवीन जरा जुने