कांद्याच्या सरासरी दरात ६०० रुपयांच्या आसपास वाढ

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या सरासरी दरात ६०० रुपयांच्या आसपास वाढ दिसून आली. शुक्रवारी रात्री कांद्याचे निर्यातमुल्य शून्यावर आणल्यानंतर लासलगाव बाजार समितीमध्ये दोन दिवसाच्या सुट्टीनंतर सोमवारी हा ६०० रुपये प्रती क्विंटलमागे वाढीचा फरक दिसून आला. शुक्रवारी लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे जास्तीत जास्त दर १७४० तर सरासरी दर १४५१ , किमान ७०० रुपये होते . आज निर्यातमुल्य शून्य केल्यानंतर लिलावाची पहिलीच वेळ असताना कांद्याच्या भावाने उसळी घेतली. जास्तीत जास्त २२०० रुपये प्रतिक्विंटल तर सरासरीमध्ये २०७५ इतके तर किमान १०००रुपये प्रतिक्विंटल असे दर सकाळच्या सत्रामध्ये दिसून आले 
थोडे नवीन जरा जुने