विश्वलता महाविद्यालया मधे रक्तदान शिबीर सपन्न.

विश्वलता महाविद्यालया मधे रक्तदान शिबीर सपन्न.

येवला - प्रतिनिधी
      
श्री साईराज शिक्षण प्रतिष्ठान पुणे संचलित विश्वलता कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय भाटगांव ता.येवला जि.नाशिक आणि संजीवनी रक्तपेढी कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दिनांक ३ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.यात महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी व विद्यार्थीनींनी मोठ्या संख्येने व उत्साहात सहभाग घेतला.रक्तदान शिबीरात संस्थेचे सचिव   प्रशांत भंडारे, महाविद्यालयीन प्राध्यापिका प्रा. कोकाटे एस.  एम.व प्रा. नानकर एच. बी. महाविद्यालयीन विद्यार्थीनी कु. वाळके प्रतिक्षा व अन्य २५ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. या शिबिरात एकूण २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

       
रक्तदान शिबीरास सुरवात संस्थेचे सचिव  प्रशांत भंडारे यांच्यापासून झाली,महाविद्यालयाचे प्राचार्य कदम डि.के.रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा बळे ए.पी,सहाय्यक अधिकारी काकडे बी.आर, महाविद्यालयीन प्राध्यापकवृंद व संजीवनी रक्तपेढी मधील डॉ.नीता पाटील व त्यांचे सहकारी उपस्थित होते.



थोडे नवीन जरा जुने