शिवनेरी ते लखनउ रॅलीचे येवल्यात स्वागत
पारंपारिक हलकडीच्या कडकडातील स्वागताने सहभागी तरुणही भारावले
येवला - प्रतिनिधी
उत्तर भारतात प्रथमच छत्रपती शिवरायांची जयंती भव्य प्रमाणात साजरी करायची असल्याने व त्यासाठी काहीतरी साहसी करावे, शिवरायांना शोभेल असे धाडसी काम करावे, म्हणुन मोटरसाइकलने शिवज्योत घेवुन निघालेली शिवनेरी ते लखनौ रॅली येवला शहरात दाखल होताच पारंपारीक हलकडीच्या कडकडात जोषात स्वागत करण्यात आले. या स्वागताने सर्वच भाराउन गेले.
शहरातील फत्तेबुरुज नाका येथे या रॅलीचे आगमन होताच ही रॅली सवाद्य मिरवणूकिने शहरातील विंचूर चौफुली येथे आली. येथे रॅलीचे प्रमुख पांडुरंग राउत, शशिकांत कदम, दिपक पगार व रॅलीतील सहभागी युवकांचा माजी आमदार मारोतराव पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस ऍड. माणिकराव शिंदे, जिल्हा सहकार चळवळीचे नेते अंबादास बनकर यांनी सत्कार केला. यावेळी राष्ट्रिय कॉंग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड, नगरसेवक प्रविण बनकर, ऍड. शाहू शिंदे, अर्जून कोकाटे, भास्कर कोंढरे, सुभाष पाटोळे, संजय सोमासे, सुदाम पडोळ, बाळासाहेब गांगुर्डे, योगेश्वर ठोंबरे, प्रविण निकम, दामोधर कोकरे, तुषार शिंदे, श्रीकांत खंदारे, सुंनील गायकवाड, देविदास जाधव, संजय पवार यांच्यासह शिवप्रेमी नागरिकांनी विंचूर चौफुली येथे मोठी गर्दी केली होती.
या यात्रेमध्ये जे तरुण सहभागी झाले होते त्यांना कुठलाही आर्थिक भार सहन करावा लागू नये म्हणून मोटारसायकलच्या इंधनापासून ते रॅली काळातील संपूर्ण खर्च उत्तर प्रदेशातील मराठी बांधवांनी उचलला. यात उत्तर प्रदेश मधील सुमारे दहा हजार परिवारानी सहभाग घेतला. या रॅली मार्गातील या प्रवासात जंगली महाराज आश्रम (कोपरगाव ), धुळे, इंदोर भोपाळ, झांसी, ग्वाल्हेर, आग्रा, कानपुर येथे रॅलीत सहभागी तरुणांचे भव्य स्वागत ठेवण्यात आले. आग्रा येथे मराठी बांधवानी भव्य स्वागताची तयारी केली आहे. हा कार्यक्रम सामाजीक बांधीलकीचा कार्यक्रम असल्याने या उपक्रमात सर्व पक्षातील राजकारणातील सामाजीक संघटना जोडाल्या गेल्या. महाराष्ट्रातील शेकडो मावळे कामाला लागले. उत्तर प्रदेश मधील हजारो हात पुढे आले. या कार्यक्रमाची गुंज दिल्ली पर्यंत नक्की जाइल. काही वर्षाने जसा गणेश उत्सव सपुर्ण भारतात साजरा केला जातो, तसाच शिवजयंती हा उत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याचे यावेळी पांडूरंग राउत यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव साजरा करण्यासाठी ही रॅली शिवज्योत घेऊन लखनऊ येथे १ हजार ६५१ किलोमीटरचा प्रवास करुन पोहोचणार आहे. नखनौ येथे शिव छत्रपतीचा भव्य अश्वारुढ पुतळा उभा करण्यात आला आहे. तेथे शिवजंयती साजरी करुन या रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीतील सर्व सहभागी तरुणांसाठी एक स्वतंत्र आचारंसंहिता तयार करण्यात आली आहे, असेही राउत यांनी सांगितले.
या रॅलीत दिपक पगार, संनील खेलुकर, पंकज पवार, वसंत विसपूते, बळीराम पाटील, रामदास पवार, देविदास आहेर, प्रतिभा आहेर यांच्यासह सुमारे २५० युवक सहभागी झालेले आहे. या रॅलीला ऍड. माणिकराव शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.