येवला बाजार समिती मध्ये अंतर्गत रस्ते ट्रिमिक्स काँक्रीटीकरण कामाचे भुमिपूजन
येवला- वार्ताहर
कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य आवार येवला, उपबाजार अंदरसुल व उपबाजार पाटोदा येथे जागतिक बँक अनुदानित महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प (एम. ए. सी. पी.) अंतर्गत पायाभुत व उत्पादक सुविधा निर्माण करणेसाठी रु. 4 कोटी 42 लाख पंचावन्न हजार रकमेची विविध विकास कामे व बांधकामे करण्यात येत आहेत. त्यापैकी मुख्य आवारातील रु. 1 कोटी 28 लाख 33 हजार रकमेच्या अंतर्गत रस्ते ट्रिमिक्स काँक्रीटीकरण कामाचे भुमिपूजन संचालक मंडळाच्या उपस्थितीत बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे व उपसभापती गणपत कांदळकर यांचे शुभहस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आले.
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प अंतर्गत जागतिक बँकेकडून मुलभुत व पायाभुत सुविधांसाठी 50% व उत्पादक सुविधांसाठी 25% याप्रमाणे सर्व कामांना अंदाजे रु. 1 कोटी 40 लाख इतके अनुदान मिळणार आहे. याप्रसंगी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे, सभापती उषाताई शिंदे, उपसभापती गणपतराव कांदळकर, संजय बनकर, संतु पा. झांबरे, नवनाथ पा. काळे, कृष्णराव गुंड, भास्कर कोंढरे, कांतीलाल साळवे, अशोक मेंगाणे, मकरंद सोनवणे, मोहन शेलार, धोंडीराम कदम, राधाबाई गायकवाड, प्रमोद पाटील, गोरख सुराशे, नंदुशेठ आट्टल, सुभाष समदडीया, शासकीय प्रतिनिधी इंजि. साहेबराव सैद, एकनाथ साताळकर तसेच देविदास शेळके, खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री. राजेंद्ग गायकवाड, ठेकेदार श्री. नानसाहेब पाटील, बाजार समितीचे सचिव डी. सी. खैरनार, अधिकारी/कर्मचारी आदि उपस्थित होते.