येवल्यात शिवजयंती उत्सव समितीची नियोजन बैठक संपन्न

 
 
येवल्यात शिवजयंती उत्सव समितीची नियोजन बैठक संपन्न 
येवला : वार्ताहर
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने येवल्यात 75 वर्षापूर्वी सुरु झालेल्या ऐतिहासिक शिवजयंती उत्सव सुरु झाला.उत्सवाच्या पार्श्वभूमीवर समितीची  छत्रपती शिवाजीमहाराज यांची 390 वी जयंती दिमाखात साजरी करण्यासाठी नियोजन बैठक संपन्न झाली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक सुभाष पहिलवान पाटोळे होते.
यावेळी नगरसेवक गणेश शिंदे यांनी मिरवणुकीत झांजपथक आणि अश्वावर छत्रपतीच्या वेशभूषेत युवक,मावळे ,यांचा जिवंत देखावा पारंपारिक हलकडीच्या नादात शहरातून मिरवावा व शिवजयंती निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करावे अशी सूचना केली.येवल्याचा शिवजयंतीला स्वातंत्र्यपूर्व काळाचा जाज्वल्य इतिहास,आणि क्रांतीसिह नाना पाटलांची प्रेरणा आहे.त्यामुळे या शिवजयंतीला कोणत्याही पक्षाचे लेबल नसल्याचे प्रास्ताविकात  दत्ता महाले यांनी स्पष्ट केले.
सालाबादाप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बुधवार 15 मार्च रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन केले असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.15 मार्च रोजी सकाळी 9 वा. शहरातील पाटोळे गल्लीत जिजाऊ मासाहेबांच्या प्रतिमेचे व छत्रपतीच्या पुतळ्याचे पूजन  होवून पारंपारिक हलकडी ,ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघणार आहे. तरी देशप्रेमी नागरिक व शिवभक्तांनी जास्तित जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 390 व्या जयंती निमित्त सालाबादाप्रमाणे यावर्षीही जयंती साजरी करण्यासाठी शिवप्रेमींनी कंबर कसली असून त्याबाबत जय्यत तयारी सुरु आहे. त्यसाठी कार्यकर्ते परिश्रम घेत आहे. त्यासाठी मिरवणूक परिसरात सुशोभिकरण व  परिसरातील स्वच्छता करण्यात येणार आहे. उत्सव समितीच्या बैठकीत युवराज पाटोळे,सागर वाडेकर,सुनील गायकवाड,दीपक गुप्ता,हरीश नागपुरे,बालू शिंदे,प्रीतेश शिंदे,कृष्णा वाघ,अमोल भावसार,सोमनाथ नागपुरे,निलेश शिंत्रे,कल्पेश शिंदे,दादू शेख,हरीश वाघमारे,गणेश पाटोळे,नाना पाटोळे,अमित मांडवडे,सुधाकर पाटोळे ,सुमित शिंत्रे,योगेश पाटोळे,अभिषेक शिरसाठ,गणेश पवार,शिवबा पाटोळे,कृष्णा पाटोळे ,यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.
_______________________________________________________________________________________

फोटो कॅप्शन 
येवल्याची ऐतिहासिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी आयोजित बैठकीत नगरसेवक गणेश शिंदे ,सुभाष पाटोळे,दीपक गुप्ता,युवराज पाटोळे,अमित मांडवडे,व कार्यकर्ते 
________________________________________________________________________________________
 


थोडे नवीन जरा जुने