श्री क्षेत्र पारेगाव ते श्री क्षेत्र पैठण पायी दिंडीचे सोहळ्याचे ४२ वे वर्ष पूर्ण .........!
येवला - वार्ताहर
संत एकनाथ महाराज यांच्या पैठण येथील नाथ षष्टी सोहळ्या निमित्त गेल्या ४० वर्षापासून ह.भ.प कै विठ्ठलतात्या खिल्लारे यांनी सुरु केलेल्या येवला तालुक्यातील पारेगाव ते पैठण या दिंडी सोहळ्यास ४१ वर्षे पूर्ण झाली आहे दिंडीचे यावर्षीचे प्रस्थान पारेगाव येथून दि रविवार दि ०९/३/२०१७ रोजी झाले असुन् यानंतर कोटमगाव,गवंडगाव,वैजापूर महालगाव,गंगापूर,ढोरेगाव,इसारवा
दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी व दिंडी मार्गावर नाश्ता व जेवणाची सोय मुक्कामी असलेल्या ठिकाणचे स्थानिक गावकरी मंडळी करतात हि सेवा गेली ४१ वर्षापासून अखंडित सुरु आहे व यापुढे देखील अशीच सुरु राहील अशी माहिती दिंडीचे व्यवस्थापक केशव ढगे , दौलत सुरासे यांनी दिली.
सोबत श्री क्षेत्र पारेगाव येथील दिंडी सोहळा प्रस्तानाचे फोटो दिले आहेत