स्त्री ही आजही स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नसल्याची खंत । स्वाती गुजराथी

  स्त्री ही आजही स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नसल्याची खंत । स्वाती गुजराथी
 

येवला ।  अनेक साधने बदलली,किचनमध्ये अद्यावत सोयी आल्या, टीव्ही, इंटरनेट, मोबाईलुळे स्त्री ही जगाशी जोडली गेली परंतु खर्‍या अर्थाने ती आजही पूर्ण स्वावलंबी झालेली नसुन घरातील महत्वाचा कोणताही निर्णय ती आजही स्वतंत्रपणे एकटी घेऊच शकत नसल्याची खंत स्वाती गुजराथी यांनी व्यक्त केली.  येथील सोममवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय महिला मंडळाच्या वतीने अयोजीत जागतिक महिला दिना निमित्त आहार, आरोग्य आणि योगाविषयक मार्गदर्शन कार्यक्रमा प्रसंगी त्या बोलत होत्या.  कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलानाने करण्यात आली.  याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणुन जगदंबा महिला ज्येष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षा कुसुम कलंत्री, मनमाड येथील उद्योजक व्याख्यात्या दैनिक जनश्रद्धाच्या व्यवस्थापकीय संचालिका स्वाती गुजराथी ह्या उपस्थित होत्या. 
स्त्रीची १६ व्या शतकापासुन २१ व्या शतकाकडे सुरु असलेली वाटचालीचे विश्‍लेषण देत आज एकत्र कुटुंब पद्धतीचा र्‍हास झाल्यामुळे संस्कार करण्याची जबाबदारी आईवरच आहे. आजची स्त्री ही कुटुंबासाठी, मुलांसाठी धावते आहे त्यांच्यासाठी व्रत, वैकल्ये करीत आहे, माणुस म्हणुन जगण्याचा हक्क मागत आहे तरीही भृणहत्या होतच आहे यावर गुजराथी यांनी सादर केलेले एकपात्रीने उपस्थित महिलांचे डोळे पाणावले.  आपण कसे दिसतो या बाह्य सौंदर्या पेक्षा आपण अंर्तमनातुन कसे प्रत्यक्ष व्यक्त होतो याला पुढील जीवनात महत्त्व असल्याने आंतरिक सौंदर्य जोपासण्याची सवय लहान वया पासूनच अंगिकारणे गरजेचे आहे. आजच्या मोबाइल, इंटरनेट युगात बालपणा पासून घडलेले खरे संस्कार दुरावत चालले आहेत, मेकअप, कपडे, लाइफ स्टाइल याला अवाजवी महत्त्व आले.  त्या बरोबरच स्वत: मधील दडलेले सुप्त गुण हळू हळू लोप पावत चालले आहेत ही बाब व्यक्तिमत्व विकासातील प्रमुख अडथळा ठरते आहे.  अध्यात्म, संस्कृती, वाचन आणि संस्कार यातूनच आपले व्यक्तिमत्व समृद्ध होते असेही यावेळी बोलताना गुजराथी यांनी सांगितले.  याप्रसंगी पॅनासिया हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. कविता दराडे यांनी टेस्ट ट्युब बेबी, ब्रेस्ट कॅन्सर, गर्भशायाचे कॅन्सर तसेच व्यंधत्व व महिलांच्या इतर आजारा बाबत सध्या उपलब्ध असलेले अत्याधुनिक उपचारा बाबत महिलांना मार्गदर्शन केले.  डॉ. संगिता पटेल यांनी महिलांच्या प्रसुती काळात घ्यावयाच्या काळजी, तसेच मुलींना पाळी आल्यापासुन मोनोपॉज पर्यंतच्या समस्यां बाबत मार्गदर्शन केले.  डॉ. दिपाली क्षत्रिय यांनी महिलांचे आरोग्य विषयक आहारा बाबत मार्गदर्शन केले.  ज्योती जयप्रकाश कोकणे यांनी महिलांना योगा विषयक माहिती देऊन योगशिक्षण हे महिलांच्या आरोग्यास अत्यंत गरजेचे असल्या बाबत मार्गदर्शन केले. 
दरम्यान महिलांसाठी घेण्यात आलेल्या प्रश्‍न मंजुषा कार्यक्रमात विजेत्या स्पर्धक सिमा कोकणे, सुजाता बिल्लाडे, शारदा कोकणे, वंदना दाणेज, लक्ष्मी भांडगे, सुनिता कोकणे, रेखा पांढरे, दिपा फणसे, मीना कोकणे, आदींना मान्यवरांचे हस्ते पारितोषीके देण्यात आली.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुहासिनी कोकणे यांनी केले तर आभार नगरसेविका सरोजिनी वखारे यांनी व्यक्त केले.  
कार्यक्रमास सो.क्ष. महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगलाबाई कोकणे, उपाध्यक्षा शशिकला फणसे, येवले नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सरोजिनी वखारे, माजी नगराध्यक्षा राजश्री पहिलवान, बिना क्षत्रिय, कल्पना खानापुरे, कल्पना कुक्कर, स्वप्ना कुक्कर, भिकाबाई वाडेकर, मिराबाई वाडेकर, सौ. चौधरी, रतनबाई कोकणे, वत्सलाबाई बाकळे, गंगुबाई वखारे, आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.  कार्यक्रम यशस्वीततेसाठी प्रगती महिला बचत गट व सहस्त्रार्जुन समाज महिला मंडळाच्या सर्व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.

थोडे नवीन जरा जुने