बल्हेगावमध्ये रस्ता कॉंक्रेटीकरणाचे सरपंच, उपसरपंचांच्या हस्ते उद्घाटन
येवला - वार्ताहर
बल्हेगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गावाअंतर्गत रस्ता कॉंक्रेटीकरणाचे उद्घाटन शुक्रवारी सरपंच मिरा कापसे व उपसरपंच हर्षदा पगारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
ग्रामपंचायतीच्या वतीने गावाचा विकास व्हावा व गावातील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. गावातील मुख्य वस्तीत रस्ते हे खड्ड्यांनी ग्रासलेले होते. विविध सार्वजनिक उत्सवाच्या वेळी रस्ते नसल्याने मोठी वाहने गावात प्रवेश करतांना अडचणी निर्माण होत होत्या. गावातील सार्वजनिक उत्सवासाठी जागा मातीच्या होत्या. ह्या सारख्या समस्या लक्षात घेवून ग्रामपंचायतीने नागरिकांच्या मुलभूत समस्या सोडविण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव देवून पाठपुरावा केला व काम मंजूर करुन घेऊन गावाच्या विकासाला चालना देण्यास भर पडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या स्नेहलता सोमासे, छायाबाई मोरे, आशा जाधव, अनिल मोरे, भाऊसाहेब कापसे, जितेश पगारे, अमोल जमधडे, सुभाष सोमासे, ग्रामसेवक गणेश रोकडे आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.