भारतीय संविधानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्ष आचार-विचाराला प्राधान्यक्रम- प्रा.सुभाष वारे
येवला | दि. ६ प्रतिनिधी
नावाचा जयघोष आज सर्वच करतात. राजकिय पक्ष उठता-बसता शिवाजी महाराजांच्या स्वराज्यांच्या संकल्पनेचे कौतूक करतात. तथापी या विचारांना आचाराची जोड देण्याची वेळ आली की सोयीस्करपणे या रयतेच्या राजाकडे कानाडोळा करुन आपला परंपरागत विचारांचा अजेंडा राबविण्यासाठी कसब करतात, मात्र त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व धर्मियांना समान न्याय देण्याच्या धर्मनिरपेक्ष विचारांचा घटनाकारांनी भारतीय संविधानात प्राधान्याने अंतर्भाव केला असल्यामुळे शिवाजी हा अलौकिक राजा तर होताच पंरतू कोणत्याही एका धर्माचा अंगीकार करणारा वा व्देष करणारा तो राजा नव्हता हे अनेकदा सिद्ध झाले असल्याचे प्रतिपादन प्रसिध्द पुरोगामी विचारवंत प्रा.सुभाष वारे यांनी येवले येथे बोलतांना काढले.
येखील राष्ट्र सेवा दल आणि रायगड ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे औचित्य साधून येवले येथील उर्दु भाषीक विद्यार्थ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजः एक जाती-धर्मनिरपेक्ष लोकराजा या विषयावर आयोजिक वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात विशेष अतिथी म्हणून प्रा.सुभाष वारे बोलत होते, समारंभास नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ.सुधीर तांबे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना प्रा.सुभाष वारे म्हणाले, शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष लोकराजा या अशा अत्यंत महत्वाच्या पंरतु काही लोकांच्या दृष्टीने संवेदनशील विषयावर येवला राष्ट्र सेवा दलाने मोठ्या धाडसाने या ज्या उर्दु मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा घेतल्या त्यांचे मी जाहिर कौतूक करतो, त्यांच्या हिंमतीला दाद देतो. कधी नव्हे ते आज सामाजिक, राजकिय, धार्मिक वातावरण अत्यंत गढूळ झाले आहे. असहिष्णुता नावाचा व्हायरस अवघा समाज व्यवस्था नासवत असून त्यास सरकारी पातळीवरुन मिळत असलेले बळ चिंतनीय आहे. भारताचे भविष्य घडविणार्या संविधानाऐवजी पंरपरागत असे धार्मिक आणि जातीय कायद्याचा सर्रास वापर करीत भारतीय राज्यघटनेलाच आव्हान देण्याच्या वास्तव स्थितीत रयतेचा राजा शिवाजी महाराजांच्या खर्या इतिहासाचा अभ्यास करुन उर्दु भाषीक मुलांच्या तोंडून तो सत्य इतिहास ऐकविण्याचा हा उपक्रम अनुकरणीय, अनोखा आणि मोठ्या संस्खेने असलेले राजकीय लोक यांना सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवितांना संविधानातील काही कलम गैरसोईचे होत असल्याने त्यांनी घरातील आणि मनुस्मृतीने सांगीतलेल्या कायद्यांचा वारेमाप वापर करीत भारतीय संविधानाला अभिप्रेत समाजव्यवस्था निर्माण करणयात अडचण आणली आहे. अशी खरमरीत टीका करुन प्रा.वारे यांनी धर्मनिरपेक्षता म्हणजे कोणत्याही धर्माला राजाश्रय न देता सर्वांना समान अंतरावर ठेवून व्यक्तीने वैयक्तिक जीवनात धर्माचरण करावे, आजचा हा कार्यक्रम खर्या अर्थाने सेक्युलर म्हणजे हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माच्या लोकांना एकत्र करुन केला गेलेला कार्यक्रम आहे. आपल्या धर्माला, जातीला व लिंगाला प्राधान्यक्रम न देता शिवाजी माराजांच्या विचारांबरोबरच आचरण करायला सांगणार्या त्यांच्या खर्या इतिहासाचा जागर करणारा हा कार्यक्रम होता, महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात असे एकोपा निर्माण करणारे कार्यक्रम व्हायला हवेत असे स्पष्ट मत व्यक्त केले.
यावेळी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ.सुधीर तांबे, रायगड ग्रुपचे सर्वासर्वे ऍड. माणिकराव शिंदे, पत्रकार कमलकांत वडेलकर, नगराध्यक्ष बंडू पहिलवान क्षिरसागर, उपनगराध्यक्ष सनीशेठ पटणी आदिंची समायोचित भाषणे झाली. राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ कार्यकर्ते प्रा.अर्जुन कोकाटे यांनी खास उर्दु भाषिक मुलांच्या या लोकराजा शिवाजी महाराजांवरील वक्तृत्व स्पर्धे मागील उद्देश स्पष्ट केला. व्यासपीठावर मा.आ.मारोतराव पवार, सहकार नेते अंबादास बनकर, जेष्ठ उद्योगपती सुशीलभाई गुजराथी, नगरसेवक सचिन शिंदे, प्रा.डॉ.भाऊसाहेब गमे, प्रा.प्रकाशआण्णा देवरे, प्रा.व्ही.जी.पाटील, सनाउल्ला फारुकी, शुद्धोधन तायडे, उपस्थित होते.
या स्पर्धेला येवला उर्दु गर्ल्स हायस्कुलची इ.८ वी च्या वर्गात शिकत असलेली विद्यार्थीनी कुमारी अन्सारी तुबा शफिक अजुंम हिने प्रथम, अँग्लो उर्दु हायस्कुलचा कुमार अन्सारी इरशाद मोहम्मद असरार व्दितीय तर कुमारी शेख आयशा अजुंम नौकिल अहमद हीने तृतीय क्रमांक पटकविला. विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव चिन्ह सहभागचे प्रमाणपत्र आणि प्रा.सुभाष वारे लिखित आपले भविष्य, भारतीय संविधान हे पुस्तक देऊन गौरविण्यात आले तर शिवाजी महाराजांवरील पोवाडे स्पर्धेत आडगाव चोथवा प्राथ.शाळेची विद्यार्थींनी कुमारी ज्ञानेश्वरी सुनिल खोकले हिने प्रथम, स्वामी मुक्तानंद विद्यालयाचा प्रथमेश योगेश भावसार याने व्दितीय तर आदर्श माध्य.विद्यालय, चिचोंडी येथील प्रेरणा मढवई हिने तृतीय क्रमांक मिळविला.
या आगळ्या-वेगळ्या समारंभास ऍड.बाबासाहेब देशमुख, नितिन काबरा, पो.पा.उत्तमराव शिंदे, एकनाथ गायकवाड, प्रा.एम्.पी.गायकवाड, दत्ता गायकवाड, दत्ता उटावळे, आय्युब शहा, चांगदेव कुळधर, जावेद अन्सारी सर, सालेक अन्सारी सर, पंडित मढवई, रामनाथ पाटील, कानिफ मढवई, बाबासाहेब कोकाटे आदि अवर्जुन उपस्थित होते.
समता प्रतिष्ठानचे सरचिटणीस दिनकर दाऩे यांनी सुत्र संचलन केले. तर उपस्थितांचे आभार रामनाथ पाटील यानी मानले.