येवल्याच्या पारंपारिक रंगोत्सवात होणार रंगांचे युद्ध

 येवल्याच्या रंगोत्सवात होणार रंगांचे युद्ध
 


येवला - वार्ताहर  
रंगपंचमी निमित्त जमणारा हजारोंचा जनसमुदाय आणि दुतर्फा ट्रॅक्टर वरील पिंपातून परस्परावर रंगाचा वर्षाव करीत अवतरत असलेले इंद्रधनुष्य हे दृष्य म्हणजे येवल्यातील रंगपंचीच्या दिवशी होणार्‍या रंगांच्या सान्यातील.  येथील टिळक मैदानासह डी.जे.रोडवर ह्या वर्षी शुक्रवारी ता. १७ रोजी येथील हे रंगांचे सामने होणार आहे. 
उत्सवप्रेमी येवले शहरात सर्वच सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. त्यापैकीच एक म्हणजे रंगपंचमी हा सण होय.  या निमित्ताने होणारे रंगाचे सामने मोठ्या उत्साहाने येथे खेळले जातात  अशा प्रकारचे आगळे-वेगळे जोशपुर्ण सामने इरतत्र कोठेही होत नसावेत.  म्हणुनच हे सामने पाहण्यासाठी आता परगावातुन लोक येऊ लागले आहे.  गेल्या वर्षी पाणी टंचाई असल्याने हे सामने होऊ शकले नाही.  परंतु यंदा हे रंगांचे जोशपुर्ण सामने होणार आहेत.  यातील पहिला सामना ५ वा. टिळक मैदान येथे तर लगेचच दुसरा समना डी.जी. रोड येथे होणार असल्याचे रंगपंचमी उत्सव समितीने एका पत्रकाद्वारे जाहिर केले आहे.  ह्या रंगोत्सवात पाळावयाच्या नियामांची एक आचार संहिता देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.  या आगळ्या वेगळ्या रंगोत्सवात जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उत्सव समितीद्वारे करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने