शनिवारपासून येवल्यात साई सच्चरीत पारायण सोहळा
संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन
येवला : वार्ताहर
शहरातील साई सेवा भक्त परिवाराच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही साई सच्चरीत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सात दिवस संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
कथाकार ह. भ. प. भागवताचार्य अनिल महाराज जमधडे यांच्या सुश्राव्य वाणीतुन कथेचे निरुपण करण्यात येणार असून कापसे पैठणीचे संचालक बाळकृष्ण कापसे व सौ. वंदनाताई कापसे यांच्या हस्ते ग्रंथ पूजन केले जाणार आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रज्वल पटेल यांच्या हस्ते आरती होणार असून २५ मार्च ते १ एप्रिल पावेतो आयोजित या महापारायण सोहळ्यात साताळीचे गजानन महाराज बेंद्रे हे ग्रंथ वाचन करणार आहे. शहरातील नगरपालिका रस्त्यावरील जुन्या कोर्टात हा महापारायण सोहळा संपन्न होणार असून २५ मार्च रोजी भागवत महात्म्य व गोकर्ण उपाख्यान २६ मार्च रोजी शुक्रचरीत्र्य, व्यासचरीत्र्य, नारदचरीत्र्य, २७ मार्च रोजी कृतीचरीत्र्य, परिक्षीत जन्मकथा, पांडवाचे स्वर्गरोहण, २८ मार्च रोजी कपिलदेव हुतीसंवाद, धुव्रचरीत्र्य, जडभरत कथा, आजामेळ चरीत्र्य, २९ मार्च रोजी इंद्रास, दुर्वास, ऋषींचा श्राप, समुद्रमंथन, बळीराजाची कथा व श्रीकृष्ण जन्मोत्सव, ३० मार्च रोजी भगवान कृष्णाच्या बाललिला, कंस उद्धार व रुख्मीणी स्वयंवर, ३१ मार्च रोजी सुदाम चरित्र्य, पांडवांचा राजसुययज्ञ, १ एप्रिल रोजी ह. भ. प. सुवर्णाताई जाधव यांच्या काल्याच्या किर्तनाने पारायण सोहळ्याची सांगता व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. साई सेवा भक्त परिवाराच्या वतीने ३ एप्रिल रोजी श्रीराम नवमी निमित्ताने सायंकाळी ५ वाजता येवला ते शिर्डी पायी दिंडीचेही आयोजन करण्यात आले आहे. पारायण सोहळ्याचा साई भक्तांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन साई सेवा भक्त परिवाराचे संस्थापक बिरजु राजपुत, अध्यक्ष श्रीकांत खंदारे, संतोश गुंजाळ, निरंजन रासकर, दिगंबर गुंजाळ, मनोज मडके, अनिल माळी, सुनील हिरे, सोनु परदेशी, मंगल परदेशी, मयुर व्यवहारे आदींनी केले आहे.