अपघात टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या सर्व ट्रक्टरला लावणार रिफ्लेक्टर
येवला बाजार समितीने घेतला ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम हाती
येवला - ट्रालीवर दुचाकी आपटुन प्रगतशील शेतकरी कै. बाळासाहेब गाढ़े यांना आपला जीव गमवावा लागला होता.असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून गाढे यांच्या स्मरणार्थ सभापती उषाताई शिंदे यांच्या पुढकारातून कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतीमाल घेवुन येणा-या वाहनांचा अपघात होवु नये याकरीता ट्रॅक्टर ट्रॉलीला मागील बाजूस रेडीअम रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम बाजार समितीने हाती घेतलेला आहे.
रेडिअम लावण्याचा कार्यक्रम बाजार समितीत आज उपविभागीय अधिकारी डॉ. राहुल खाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी रस्ता अपघातात निधन झालेले बाळासाहेब गाढे तसेच प्रभावती आहेर, सुर्यभान जगताप व मछिंद् वरे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.नाशिक जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे,संचालक किशोर दराडे,माजी सभापती संभाजी पवार,सहाय्यक निबंधक जितेंद्र शेळके,बी.आर.लोंढे, पोलिस निरीक्षक संजय पाटील,पोलिस निरीक्षक रुपचंद वाघमारे, उपनिरीक्षक खैरनार आदींची प्रमुख उपस्थिती होती.यांच्या हस्ते एका ट्रक्टरला रेडीअम रिफ्लेक्टर लावून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
आपला अपघात आपल्यासाठी धोकेदायक असतो.त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांची प्रत्येक वाहनधारकाने अमलबजावणी करून काळजी घेतली तर दोन वाहनांचे अपघात टळतील. बाजार समितीने शेतकरी हितासाठी घेतलेला पुढाकार कौतुकाचा असल्याचे प्रतिपादन पोलिस उपअधिक्षक खाडे,पवार,दराडे,शेळके,संचालक मकरंद सोनवणे,साहेबराव सैद, संतु पा. झांबरे, सुभाष समदडीया यांनी केले.सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने हा उपक्रम आम्ही राबवला असून शेतकऱ्यांनी यापुढे वाहन चालवतांना काळजी घ्यावी असे आवाहन बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे यांनी केले.इतर बाजार समित्यांनी देखील रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने असा उपक्रम हाती घ्यावा असे आवाहन बोलताना माणिकराव शिंदे यांनी केले.
यावेळी संचालक नवनाथ काळे, कृष्णराव गुंड, कांतीलाल साळवे, धोंडीराम कदम, गोरख सुराशे, नंदुशेठ आट्टल, एकनाथ साताळकर,खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष भास्कर येवले, बाळू गायकवाड, सुदाम सोनवणे, भागुनाथ उशीर, अनिल मुथा, अशोक शहा, रमेश शिंदे, रावसाहेब खैरनार, अशोक सद्गीर, रिजवान शेख,भानुदास जाधव आदि उपस्थित होते.बाजार समितीचे सचिव डी.सी.खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. के.आर.व्यापारे, बी.ए.आहेर, एस.टी.ठोक, ए.आर. कांगणे आदींनी संयोजन केले.