आशा स्वयंसेविकांना प्रति महिना २ हजार रुपये मानधन देण्यात यावे

 


 आशा स्वयंसेविकांना प्रति महिना २ हजार रुपये मानधन देण्यात यावे
येवला - वार्ताहर

वाढत्या महागाईमुळे आशा स्वयंसेवीकांना उदरनिर्वाह करणे मुश्किल झाले आहे. आशा स्वयंसेविकांना प्रति महिना २ हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तहसिलदार नरेश बहिरम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 
आज जागतिक महिला दिन असून सर्वत्र महिलांचा गौवगवा होत असतांना सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात ज्या स्त्रींया तुटपुंज अनुदानावर काम करुन त्यांच्या न्याय हक्कासाठी अनेक वेळा मागणी करुनही शासन दरबारी दखल घेतली जात नाही. शासनाच्या कुटुंब कल्याण तथा राष्ट्रीय आरोग्य विभागातील आरोग्य सेवेचा अधिक प्रसार व योग्या वापर होण्यासाठी तसेच बालमृत्युचे प्रमाण घटविण्यासाठी गाव पातळीवर घराघरापर्यंत पोहचविण्याचे काम आशा कार्यकर्त्यां मार्फत राबविले जाते. त्याचबरोबर किशोरवयीन मुलींना कॅल्शीयम दुधयुक्त गोळ्या व इतर साहित्य आशा कार्यकर्त्या मार्फत केले जाते. त्यामुळे आरोग्य सेवा शासन ते सामान्य कुटुंबापर्यंत पोहचविण्याची काम आशा कार्यकर्ते महिला करत असतात. परंतु खेदाची गोष्ट अशी फक्त महिन्याला ५०० रुपये मानधन देऊन महागाईच्या मानाने तुटपुंजी असून तेही वेळेवर मिळत नाही. आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक महिलांना मासिक २ हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. निवेदनावर स्वारिपचे तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे, विजय घोडेराव, शशिकांत जगताप, भाऊसाहेब गरुड, जनार्दन केरे, श्रावण देवरे, शिवाजी गायकवाड, सरपंच आशाबाई झाल्टे, विजय साबळे, भाऊसाहेब साबळे आदींच्या स्वाक्षर्‍या आहे.

थोडे नवीन जरा जुने