येवला मतदार संघातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी ८ कोटी ९० लक्ष रुपये निधीची अर्थसंकल्पात तरतूद

येवला मतदार संघातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी

८ कोटी ९० लक्ष रुपये निधीची अर्थसंकल्पात तरतूद

 

येवला :- वार्ताहर

दि.१८ मार्च २०१७ रोजी जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात येवला तालुक्यातील रस्त्यांची  सुधारणा व २ वर्षाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ८  कोटी ९० लक्ष रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. येवला मतदार संघाचे आमदार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या रस्त्यांच्या कामांना निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. या मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे.

 

दि.१८ मार्च २०१७ रोजी जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मंजुर झालेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये येवला तालुक्यातील नाशिक -निफाड -येवला प्ररामा क्र.२  रस्त्याच्या १० किमी अंतराच्या सुधारणेसाठी व दोन वर्ष देखभाल व दुरुस्तीसाठी ३ कोटी रुपये,अनकाई- कुसमाडी- नगरसूल-अंदरसूल-पिंपळगाव जलाल रस्ता प्रजिमा-६५ च्या २६/३०० ते ६८/२०० किमी सुधारणा व 2 वर्षे देखभाल व् दुरुस्तीसाठी ३ कोटी रुपये निधीनिफाड तालुक्यातील विंचूर सावळी विहीर रस्ता राज्य महामार्ग क्र.७ च्या १८९/६०० ते १९९/६०० किमी रस्त्याच्या सुधारणा व २ वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीसाठी २ कोटी ९० लक्ष रुपये निधी असे एकूण ८  कोटी ९० लक्ष रुपयांच्या या रस्त्यांचा कामांचा समावेश आहे. लवकरच या कामांना सुरवात करण्यात येणार असल्याची माहिती लोखंडे यांनी दिली आहे.

थोडे नवीन जरा जुने