येवला नगरपरिषदेत महिला दिन साजरा.



येवला नगरपरिषदेत महिला दिन साजरा.
येवला - वार्ताहर
येवला नगरपरिषद येवला येथे 8 मार्च 2017 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे अनुषंगाने महिलांमध्ये मतदान नोंदणी संदर्भात जागृती कार्यक्रम महिला सक्षमीकरण स्वच्छता बाबत मार्गदर्शन तसेच दिनदयाळ अंत्योदय योजना विषयी महिलाना सविस्तर मार्गदर्शन प्रकल्प अधिकारी शंतनु वक्ते  यांनी केले
        कार्यक्रमाचे संचालन सुषमा विखे यांनी केले सुरवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेला पुष्प अर्पण करूण रितसर कार्यक्रमाला सुरूवात झाली . महिलांमध्ये मतदान नोंदणी बाबत मार्गदर्शन नगर परिषद चे मुख्य लिपीक पी वाय मांडवडकर यांनी केले . तसेच महिला सक्षमीकरण विषयी महिलांना आजच्या परिस्थिती नुसार स्वतामध्ये बदल करून पुरूषाच्या खांदयाला खांदा लावुन पुढे जाण्याबाबत अर्जुन कोकाटे, संघटक राष्ट्रसेवा दल  प्रणित शेतकरी पंचायत येवला यांनी मार्गदर्शन केले .सदर कार्यक्रमात उपमुख्यधिकारी आर आय शेख  उपस्थित होते. महिलांना स्वच्छता विषयी  तसेच वैयक्तिक शौचालया विषयी शासनाच्या विविध योजना विषयी स्वच्छता विभागाचे अभियंता सत्यवान गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.  श्रीमती सुनंदा काळे  यांनी देखील महिला दिनानिमित्त स्त्री शक्ती विषयी उपस्थित महिलाना जाणीव करून दिली . महिलां मध्ये उत्साह वाढविण्यासाठी टिकली लावणे स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये  अनिता रविंद्र कुमावत,जयश्री किरण कुमावत,अलका शंकर पवार ,वैशाली राकेश मांजरे,दर्शना श्रावण सोनवणे ,निलोफर राजु शेख,उषा योगेश कुमावत , संगिता ईश्वर लांडगे या महिला विजयी झाल्या 
  तसेच या कार्यक्रमांला साईसिध्दी महिला बचत गट, श्री महालक्ष्मी महिला बचत गट ,आत्मा मालिक महिला  बचत गट ,गीता महिला बचत गट ,भारतीयनारी महिला बचत गट ,गीतांजली महिला बचत गट ,दिपमाला 
  महिला बचत गट , गुरूकृपा महिला बचत गट इ बचत गटांतील महिला उपस्थित होत्या कार्यक्रमास  सरस्वती तुंबारे  व उज्वला अहिरे हया उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शंतनु वक्ते सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांनी केले.
  
   

थोडे नवीन जरा जुने