भिंगारे प्राथमिक शाळेतील चिमुकले चिऊताई च्या संवर्धनासाठी सरसावले पक्षीमित्र विद्यार्थ्यांनी केली पक्षांच्या दाणा-पाण्याची सोय.



भिंगारे प्राथमिक शाळेतील चिमुकले चिऊताई च्या संवर्धनासाठी सरसावले
पक्षीमित्र विद्यार्थ्यांनी केली पक्षांच्या दाणा-पाण्याची सोय.
------
येवला  : वार्ताहर
 भिंगारे (ता.येवला) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या टाकाऊ वस्तूंपासून पक्षांसाठी अन्न व पाण्याची भांडी स्वतः तयार केली. त्या भांड्यात पाणी व दाणे ठेवून पक्षांच्या​ संवर्धनचा संकल्प केला. शालेय आवारात ९० ते १०० लहान - मोठी  झाडे आहेत व परिसरातील अनेक ठिकाणी पक्ष्यांचे घरटे आहेत. त्यामुळे शाळेत नेहमीच पक्षांचा किलबिलाट असतो , परंतु वाढत्या तापमानात अन्न व पाण्याअभावी काही दिवसांपासून शाळेतील हा किलबिलाट बंद झाला होता. ही बाब ​शिक्षक व विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पक्षांची मदत करण्याचे ठरविले. 
       शिक्षक व मुलांनी पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या, सलाईन बाटल्या, बरण्या व डबे यांपासून विविध आकारांची पाणी व दाण्यासाठी भांडी स्वतः तयार केली.सर्व विद्यार्थ्यांनी दोन याप्रमाणे तयार करून शालेय परिसरात लावण्यात आली.व्यवस्था करत असताना चिऊताई सह विविध पक्षांनी हजेरी लावल्याने​ विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.
      तसेच प्रत्येक मुलाने स्वतःच्या घराजवळ अशी व्यवस्था करण्याचे ठरवले. विद्यार्थ्यांना पक्षी​ संरक्षण व संवर्धन करण्याची भावना जागृत होऊन प्राणीमात्रांविषयी आपुलकी निर्माण व्हावी. यासाठी शिक्षक ज्ञानेश्वर बारगळ यांनी निसर्गचक्रातील​ पक्षांचे महत्त्व समजावून सांगितले.याप्रसंगी मुख्याध्यापक छाया गुठे, कमल बिडवे, भाऊसाहेब गाडे उपस्थित होते.
-----
 
थोडे नवीन जरा जुने