पुण्यस्मरणानिमित्त वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिठाई व खाऊचे वाटप
येवला : वार्ताहर
येथील निवासी व के. जे. सोमैया महाविद्यालय कोपरगाव येथील हिंदी विभाग प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे यांनी आपले वडील कै. शामराव बारकु मोरे यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त स्थानिक डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिठाई व खाऊचे वाटप केले. याप्रसंगी डॉ. आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव उंबरे, वसतीगृह अधीक्षक भाऊसाहेब खैरनार, कर्मचारी वसंत पवार उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. मोरे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करतांना सांगितले की, वसतीगृहात राहून शिकणार्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु तरीही आपण जिद्द व चिकाटी ठेऊन जास्तीत जास्त शिकले पाहिजे व मोठ्या ध्येया पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलास आपले कुटुंब व समाज प्रगतीपथावर पोहचेल. यावेळी त्यांनी आपल्या वडीलांच्या आठवणींना ही उजाळा दिला. कार्यक्रमाच्या शेवटी वसतीगृहाचे अधीक्षक खैरनार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन उपस्थितांचे आभार मानले.