संस्कृती पैठणीतर्फे शहीद जवान मातेचा नेऊरगाव येथे आदरयुक्त सत्कार
पुरणगाव आत्मा मालिकमध्येही सत्कार
जळगाव नेऊर - नेऊरगाव ता.येवला येथील शहीद जवान गुलाब कदम यांची वीरमाता सौ.पुष्पाबाई संपत कदम यांचा आदरयुक्त सत्कार संस्कृती पैठणी जळगाव नेऊर यांचे वतीने पोलीस निरीक्षक रूपचंद वाघमारे, संस्कृती पैठणी संचालक दत्तु वाघ यांचे हस्ते पैठणी, शाल व गुलाब पुष्प देवून करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृती पैठणी चे संचालक दत्तु वाघ यांनी केले.
यावेळी नेऊरगाव येथील तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष भाऊसाहेब कदम, शहीद गुलाब कदम यांचे बंधु सोमनाथ कदम, चंद्रभान कदम, सामाजिक कार्यकर्ते उद्धव बोराडे, सुर्यभान बोराडे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख गणेश पेंढारी, सुभाष कदम, शेखर कदम, बाळु कुर्हाडे, विठ्ठल बोराडे, नामदेव वरे, नानासाहेब कुर्हाडे, अंकुश कदम,पोलीस हवा. उगलमुगले, पत्रकार बापूसाहेब वाघ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
संस्कृती पैठणीतर्फे पुरणगाव आत्मा मालिक मध्येही सत्कार- पुरणगाव ता.येवला येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरूकुलात जागतिक महीला दिनाचे औचित्य साधुन जळगाव नेऊर येथील संस्कृती पैठणीतर्फे पोलीस निरीक्षक रूपचंद वाघमारे व संस्कृती पैठणी संचालक दत्तु वाघ यांचे हस्ते प्राचार्या विद्या सांगळे व उपप्राचार्या आरती मनमाडकर यांचा शाल ,ट्राॅफी व गुलाब पुष्प देवून यथोचीत सत्कार करण्यात आला.
यावेळी संत सेवादास महाराज, पुरणगाव आत्मा मालिक कार्यालयीन अधिक्षक प्रमोद शेलार, पत्रकार बापूसाहेब वाघ, पो.हवा.उगलमुगले आदी शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
फोटोखाली - संस्कृती पैठणीतर्फे नेऊरगाव ता.येवला येथे शहीद जवान मातेचा आदरयुक्त सत्कार करताना पोलीस निरीक्षक रूपचंद वाघमारे, संस्कृती पैठणीचे संचालक दत्तु वाघ, तंटामुक्तीचे भाऊसाहेब कदम, पत्रकार बापूसाहेब वाघ आदी मान्यवर.