बल्हेगाव येथे जागतिक महिला दिन सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाच्या दिवशी साजरा

बल्हेगाव येथे जागतिक महिला दिन सावित्रीबाई फुले स्मृतिदिनाच्या दिवशी साजरा

येवला - वार्ताहर
बल्हेगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मिरा कापसे व उपसरपंच हर्षदा
पगारे यांच्या पुढाकाराने वडगाव व बल्हेगावच्या सर्व एकत्रित करुन
स्त्रीशक्तीचा जागार आणि स्त्रियांचे हक्क-अधिकार, स्वातंत्र्य, सुरक्षितता
याविषयी माहिती होण्याच्या उद्देशाने सावित्रीबाई फुले महिलांचे प्रेरणास्थान
आहे व त्यांनी चालविलेल्या स्त्री शिक्षण चळवळीचा उद्देश समोर ठेवून जागतिक
महिला दिन त्यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी साजरा केला.
गावचा विकास करण्यासाठी स्त्रियांचा पुढाकार महत्वाचा आहे हे लक्षात घेवून
स्त्रियांना आपल्या कारभारामध्ये सामावून घेवून महिला एकजुटीचे महत्व पटवून
देण्यात आले. स्त्री शिकली कुटुंब सुधारते पर्यायाने गाव सुधारते हे तत्व
रुजावे, गावात व्यसनमुक्ती, शिक्षणाचे प्रमाण वाढावे आणि विकास साधावा यासाठी
महिलांचा पुढाकार महत्वाचा असतो याविषयी जाणीव जागृतीपर मार्गदर्शन करण्यात
आले.
गावात स्वच्छतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने उपस्थित महिलांना सुपली व साबण
वाटप करण्यात आले. मिठाई वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम
प्रसंगी बल्हेगावच ग्रामपंचायत सरपंच मिरा कापसे, उपसरपंच हर्षदा पगारे,
ग्रामपंचायत सदस्य छायाबाई मोरे, स्नेहलता सोमासे, आशा जाधव, शेतकरी
संघटनेच्या संध्या पगारे, मोहिनी पगार, ग्रामसेवक गणेश रोकडे, सुभाष सोमासे,
अशोक जाधव, संजय जमधडे, गयाबाई जमधडे, आशा संसारे, मिरा डोळस, महाजन, परदेशी,
मुजावर आदींसह महिला उपस्थित होत्या.
थोडे नवीन जरा जुने