मुखेडला संस्कृती पैठणी तर्फे महिला गौरव समारंभ संपन्न

 
 
 


मुखेड मध्ये संस्कृती पैठणी तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त महिला गौरव समारंभ संपन्न
येवला - वार्ताहर

 मुखेड ता.येवला येथे संस्कृती पैठणी तर्फे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणार्या महिलांचा गौरव करण्यात आला. येथील जनता विद्यालयात सदर कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी शिक्षिका एस.ई.शिंदे, एच.एस. पाटील, एम.एस.आगवण, एस.बी.कोल्हे, एस.के. बलकवडे,पी.के.पगारे, एस.एम.वाघ, श्रीम.शेळके आदींचा संस्कृती पैठणीचे संचालक गोविंद तांबे, दत्तु वाघ व तुकाराम रेंढे यांचे हस्ते शाल, गुलाब पुष्प व ट्राॅफी देवून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजेंद्र पाखले होते. एम.एस.आगवण यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक राजेंद्र पाखले, संस्कृती पैठणी संचालक दत्तु वाघ यांनी मनोगत व्यक्त केले .संस्कृती ससाणे, पायल कांगणे, रोशन शिरमारे, आरती बडवर यांनी भाषणे केली.
यावेळी पर्यवेक्षक एस.आर. दाभाडे, विकास ठोंबरे, एल.व्ही.लभडे, जी.एच.कोकाटे, सी.सी.खैरणार, आर.सी.महाले, एस.एम.शेळके, एस.पी. शेळके, एस.वाय.जाधव, आप्पासाहेब बडवर, अनिल वावधाने, एस.व्ही.पगार, एस.डी.चव्हाण, आर.एल.धनगरे, नितिन गोतरणे, बी.पी.वाघ आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
  मुखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातही सत्कार - येथील आरोग्य केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्यकेंद्र व संस्कृती पैठणी जळगाव नेऊर यांचे संयुक्त विद्यमाने मुखेड गटात विजयी झालेल्या नवनिर्वाचित जि.प.सदस्या, पंचायत समिती सदस्या, मुखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील आदर्श आरोग्यसेविका, आशा गटप्रवर्तक व महिला कर्मचारी यांचाही शाल, श्रीफळ, ट्राॅफी व गुलाब पुष्प देवून यथोचीत सत्कार करण्यात आला.
यावेळी जि.प.सदस्य बाळासाहेब गुंड, सभापती प्रकाश वाघ, वसंतराव पवार, नवनिर्वाचित जि.प.सदस्या कमल आहेर, पं.स.सदस्या अनिता काळे, पं.स.सदस्या कविता आठशेरे, सरपंच सचिन आहेर, छगन आहेर, ग्रा.पं.सदस्य अनंता आहेर, रावसाहेब आहेर, माजी सरपंच संजय पगार, विठ्ठलराव आठशेरे, वैद्यकीय अधिकारी डाॅ.नाईकवाडी, डाॅ.अशोक बनसोड, जी.एन.मढवई, व्ही.सी.पैठणकर, टी.ए.शेख, एस.ए.गांगुर्डे, आर.के.भवर, एस.टी.गोरे, इसळ, वाखारे, आरोग्यसेविका एस.व्ही.पगारे, एस.एस.हीरवे, आर.बी.पोतदार, एस.एस.देशमानकर, एस.एल.खारके, एल.व्ही, चव्हाण, आशागट प्रवर्तक व्ही.आर.सुताणे, एम.पी.राजगुरु, कविता वाघ, कविता राजगुरु, मिनाक्षी पगार, सरला जाधव आदी उपस्थित होते.
जिवन अमृत इंग्लिश मिडीयम मुखेड येथेही जागतिक महीला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


मुखेड ता.येवला येथील जनता विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार करताना संस्कृती पैठणीचे संचालक गोविंद तांबे, दत्तु वाघ , तुकाराम रेंढे व उपस्थित शिक्षिका, दुसरे छायाचित्र मुखेड आरोग्य केंद्रात नवनिर्वाचित जि.प.व पं.स सदस्या, आदर्श आरोग्यसेविका, आशा गटप्रवर्तक व महिला कर्मचारी यांचा सत्कार करताना संस्कृती पैठणी संचालक, वैद्यकीय अधिकारी व उपस्थित मान्यवर आदी.



थोडे नवीन जरा जुने