येवला : नाशिक येथे पार पडलेल्या कृषिथान कृषि प्रदर्शनात बाभूळगाव येथील
जगदबा एज्युकेशन सोसायटी संचलित कृषितंत्र निकेतन विद्यालयाचा तृतीय वर्षातील
विद्यार्थी साईनाथ तळेकर याचा कृषिथान गुणवंत विद्यार्थी म्हणून गौरव करण्यात
आला. या प्रदर्शनाच्या आयोजनात सक्रीय सहभाग दिल्याबद्दल कृषितंत्र निकेतन विद्यालयाचा प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला. साईनाथ तळेकर याला कृषिमंत्री एकनाथ खडसे,आमदार सिमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, सौ.न्याहारकर याच्या हस्ते कृषिथान गुणवंत विद्यार्थी पुरस्कारचे प्रशस्ती
पत्र व सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला.या कृषी प्रदर्षणात प्रवीण सानप, ए.बी.शेख,बी.ए.घोडेकर आदिसह विधार्थ्यानी शेतकऱ्यांना शेतीतील बदल तसेच आधुनिक शेतीविषयी मार्गदर्शन केले.