सातारे येथे युवा संसदेने युवकांना दिली समाज कार्याची उर्मी
येवला - वार्ताहर
युवकांमध्ये नेतृत्व गुणाचा विकास व्हावा, व युवक सक्षमीकरण व्हावे या
उद्देशाने तालुक्यातील सातारे येथे नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवा
संसदेत युवकांनी चर्चासत्र चांगलेच गाजवले. या कार्यक्रमात तालुक्यातील विविध
गावातील 30 ते 40 मंडळाचे सदस्य सहभागी झाले होते. तरुणांमध्ये असलेल्या
क्षमताची त्यांना जाण व्हावी, आणि अप्रत्यक्षरीत्या राष्ट्र निर्मितीच्या
कामात त्याचा हातभार लागावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
होते. या चर्चासत्रात देशभक्त गावकरी, आदर्श गाव, युवा संसद हा एक दिवसीय
चर्चा सत्राचा कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये आदर्श गाव संकल्पना, सध्याचा
युवक व देशभक्ती, स्वच्छ भारत मिशन, सामाजिक अंकेक्षण व सशक्त ग्रामसभा आणि
गावचा विकास याविषयावर युवकांनी सविस्तर मते मांडली. यावेळी नेहरू युवा
केंद्राचे तालुका प्रतिनिधी सचिन देव्हाडराव यांनी यावेळी भारत देश हा
तरुणांचा देश आहे. राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात झटून काम केले तर भारत
महासत्ता होण्याचे दिवस दूर नाही. असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष
येवला तालुका पोलीस निरीक्षक रुपचंद वाघमारे हे होते. प्रमुख अतिथी
प्रा.गुमानसिंग परदेशी होते. प्रास्ताविकात जिल्हा युवा समन्वयक भगवान गवई
यांनी केंद्रामार्फत चालणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. उपसरपंच साईनाथ
गचाले, ग्रामसेवक मोरे,प्रा.पंडित मढवई, अनिल ससाणे भानुदास कुलकर्णी, यांनी
युवकाशी हितगुज केले. भागवत जाधव यांनी तरुणांना विकासाचा मंत्र दिला. दक्षता
युवा मंच चे अध्यक्ष मधुकर बहिरम, पुढाकार युवा मंचचे अध्यक्ष समाधान
देव्हाडराव, केंद्राचे तालुका प्रतिनिधी सचिन देव्हाडराव यांनी यांनी युवा
संसद भरविण्याकामी विशेष परिश्रम घेतले.