संस्थाचालक व शिक्षकाच्या प्रलंबित मागण्याकरिता शाळा बंद आंदोलन .. ... बंदमुळे शाळांना अघोषित सुटी

संस्थाचालक व शिक्षकाच्या प्रलंबित मागण्याकरिता शाळा बंद आंदोलन .. ...
बंदमुळे शाळांना अघोषित सुटी


येवला :वार्ताहर
महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात प्रलंबित असलेल्या मागण्याबाबत येवला
तालुक्यातील 43 माध्यमिक शाळा व 3 खाजगी प्राथमिक शाळामधून सुमारे 900 माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,शिवाय 3 खाजगी प्राथमिक शाळामधील शिक्षक या दोन दिवसाच्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झाल्याने शाळांना अघोषित सुटी होती.विद्यार्थी नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी शाळेच्या नियोजित वेळेवर प्रवेशद्वाराजवळ आले परंतु तालुक्यातील शिक्षण संस्थाचालक या अदोलनात सहभागी असल्याने शाळेच्या कुलपं उघडल्या गेल्या नाहीत.शिवाय या आंदोलनात शिक्षक सहभागी असल्याने बंद यशस्वी झाला. गुरुवारी देखील शाळा बंद राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा,दत्तकुमार उटावळे  व कार्यवाह प्रदीप पाटील,टीडीएफ चे तालुका अध्यक्ष शिवाजी भालेराव,कास्ट्राईब चे नानासाहेब पटाईत ,शिक्षक फेडरेशन राज्य प्रतिनिधी दत्ता महाले,नवनाथ शिंदे,किशोर जगताप ,बाळासाहेब सोमासे,सौ.सविता साळुंके,शिक्षकेतर संघाचे अनिलदादा साळुंके,यांचेसह संघटनेचे पदाधिकारी यांनी तालुक्यातील सर्व शाळामधून फिरत आवाहन करून शाळा बंद का ?या बाबतची भूमिका विषद केली होती.या 2 दिवसाच्या शाळाबंद आंदोलनाने शिक्षण वर्तुळाला न्याय मिळाला नाही व शासनाचे शिक्षण विरोधी धोरण असेच चालू
राहिले तर पासून बेमुदत संपाचे धोरण निश्चित असून,परीक्षावर बहिष्कार घालण्याचा कृती कार्यक्रम संघटना हाती घेणार आहे.28 ऑगस्ट 2015 चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करणे,शिक्षकेतर कर्मचारी समितीचा अहवाल त्वरित मान्य करणे ,खाजगी शिक्षण संस्थांची स्वयातता कायम ठेवणे,क्रीडा शिक्षकावरील अन्याय दूर करणे,सन 2005 नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या सेवानिवृत्ती योजनेचा लाभ द्यावा.प्राथमिक शाळामधून लिपिक व सेवाकांची पडे कायम ठेवणे,शालेय पोषण आहार यंत्रणा स्वतंत्र राबवणे,शाळाबाह्य काम न देणे,100 टक्के अनुदानास निकष पात्र तुकड्यांना त्वरित अनुदान देणे,विनानुदानित तुकड्यावरील विद्यार्थी संख्या सर्व बाबीसाठी ग्राह्य धरणे, आदि मागण्याचा उहापोह करण्यात आला.न्याय मागण्यासाठी शिक्षण संस्थाचालक व समन्वय समितीच्या आदेशाने  येवला शहर  व तालुक्यातील  खाजगी अनुदानित व विनाअनुदानित 43 माध्यमिक शाळा व 3 खाजगी प्राथमिक शाळा मधील सुमारे 900 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंद मध्ये सहभागी झाल्याने तालुक्यातील सर्वच शाळांमधील कामकाज ठप्प राहिले. विद्यार्थ्यांना अघोषित सुट्टी मिळाली.बुधवारी व गुरुवारी शाळा बंद राहणार हे वृत्त अगोदरच अनेक विद्यार्थांना माहित झाले असले तरी सकाळी नेहमीप्रमाणे सर्वच विद्यालयात किमान 70 टक्के  विद्यार्थ्यांनी शाळामधून हजेरी लावली.पण शाळेला बंद ने अघोषित सुटी दिल्याने विद्यार्थ्यांनी मैदानावर खेळणे पसंत केले.
थोडे नवीन जरा जुने