येवला : वार्ताहर

तोंडद्यावे लागत आहे.येणाऱ्या - जाणाऱ्यांनाही दुचाकी वाहनांनाही कुत्र्यांची दहशत बसलेली असल्याने कुत्रे मागे लागल्यास जोरात वाहन पळवल्यानेही अपघात होऊ शकतो. सकाळी व रात्रीच्या वेळेस शहरातील पारेगाव
रस्त्यावरही कुत्रे वाहनांच्या मागे लागतात. यामुळे अनेकदा वाहनचालक घसरून पडलेले आहेत.
शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस असलेल्या ठिकाणी नगराध्यक्ष प्रदिप सोनवणे यांनी भेट देऊन पाहणी केली. या कुत्र्यांचे वास्तव्य असलेले ठिकाणे ही खाजगी पडीक जागा व झुडुपांचे असल्याचे सांगून त्या ठिकाणी
लवकरच साफसपाई करण्यात येईल असे सांगून लवकरच नगरपालिका प्रशासनातर्फे या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाईल असे त्यांनी सांगीतले. उघड्यावर वाया गेलेले खाद्यपदार्थ व कचरा फेकल्याने या कुत्र्यांना आयतेच खाद्य उपलब्ध होत असल्यानेही कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने हे टाळावे असे आवाहनही नगराध्यक्ष प्रदिप सोनवणे यांनी केले.
भटक्या कुत्र्यांचे चावे घेण्याच्या वाढलेल्या प्रमाणाबाबत येवला तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे पशुवैद्यक डॉ.सतिष कुऱ्हे यांनी शहराच्या आसपासच्या पोल्ट्री व्यावसायिकांना जबाबदार धरले आहे. या व्यावसायिकांकडून मृत झालेले पक्षी हे उघड्यावर फेकून दिले जात असल्याने या कुत्र्यांना आयतेच खाद्य उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगीतले. जर व्यावसायीकांकडून मृत पक्षी हे व्यवस्थीतपणे जमिनीत पुरुन त्यांची विल्हेवाट लावली तरच हा प्रश्न सुटेल असेही ते म्हणाले. महानगरपालिका या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कुत्र्यांची नसबंदी करतात त्यामुळे या कुत्र्यांच्या जन्मदरावर नियंत्रण ठेवता येते. जास्त प्रमाणात उपलब्ध असलेले खाद्य व नसबंदीची व्यवस्था नसल्याने एक एक कुत्रे वर्षातून ८ ते १० पिल्लांना जन्म देत आहे .त्यामुळे या वाढीव संख्येवर नियंत्रणासाठी कुत्र्यांची नसबंदी उपाययोजना येवला नगरपालिके राबविण्याची सुचनाही त्यांनी केली. कचरा डम्पींग ग्राऊंड हे शहरापासून १० किमी च्या वर अंतरावर असले आणि कचऱ्यांबाबत सतर्कता दाखवली तरच अश्या प्रकारांवर आळा बसू शकतो असेही डॉ.सतिष कुऱ्हे म्हणाले.