येवला - पालखेड डावा कालव्याला सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लो पाणी
आवर्तनातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येणारा साठवण तलाव भरला आहे.
त्यामुळे पालिकेने आता 15 ऑगस्टपासून शहरात तीन दिवसांआड पाणीपुरवठा
करण्याचा निर्णय घेतला आहे.
पालखेड पाटबंधारे विभागामार्फत सध्या कालव्याला ओव्हरफ्लोचे पाणी सुरू
आहे. मागील पाणी आवर्तनातून पाणीपुरवठा टप्पा क्रमांक 2 चा साठवण तलाव
अधिक क्षमतेने भरण्यात आला नव्हता. पालखेड धरणात पाणीसाठा कमी असल्याने
पाणी आवर्तनातून कमी पाणी देण्यात आल्याने पालिकेने शहराचा पाणीपुरवठा
पाच दिवसांआड केला होता. आता ओव्हरफ्लोचे पाणी मिळाल्याने पालिका तीन
दिवसाआड पाणीपुरवठा करणार आहे