विठ्ठलाचे कोटमगाव देवस्थान ट्रस्टचा 13 ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा
येवला (प्रतिनिधी)
ग्रामपंचायत प्रशासन अतिक्रमणधारकांना पाठीशी घालत असल्याने कोटमगाव
विठ्ठल देवस्थानच्या विश्वस्तांनी 13 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर
बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
पर्यटन खात्यामार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी मंदिर परिसरातील
विकासकामांसाठी मंजूर झालेला असताना केवळ अतिक्रमणांमुळे विकासकामे
पूर्णत्वास जाऊ शकत नसल्याने विश्वस्तांनी हा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन खात्यामार्फत राज्याचे सार्वजनिक बांधकाम व
पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी तालुक्यातील विठ्ठलाच्या कोटमगावात विठ्ठल
मंदिर परिसराच्या विकासासाठी सुमारे दोन कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर
केला. परंतु, मंदिराच्या उत्तर व दक्षिण बाजूस स्थानिक ग्रामस्थांनी
बांधकामे केल्याने ही अतिक्रमणे आता विकासकामांसाठी अडसर ठरू लागली आहेत.
श्री विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्तांनी 17 जानेवारी
2013 रोजी ग्रामपंचायतीला पत्र दिल्यानंतर 16 मार्च 2013 रोजी
तहसीलदारांनी सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाला अतिक्रमण हटविण्यासंदर्भात
कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 26 जानेवारी 2013 च्या ग्रामसभेतही
अतिक्रमण हटविण्यासंदर्भात ग्रामसभेने ठराव केला असून, ग्रामपंचायत
प्रशासनाने मात्र 10 जानेवारी व 8 ऑगस्ट 2013 रोजी केवळ संबंधित अतिक्रमण
धारकांना नोटिसा बजावण्याची कारवाई आद्यपपावेतो केली आहे.
अतिक्रमण निष्कासित करण्याचे धारिष्ट्य प्रशासनाने न दाखविल्याने 13
ऑगस्ट रोजी दशरथ कोटमे व गणपत ढमाले या विश्वस्तांनी तहसील कार्यालयासमोर
बेमुदत उपोषणाचा इशारा तहसीलदार शरद मंडलिक यांना निवेदनाद्वारे दिला
आहे. निवेदनाच्या प्रती पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी,
प्रांताधिकारी यांना दिल्या आहे.