येवला -(प्रतिनिधी) पालकमंत्री छगन भुजबळ यांचे संदर्भात आक्षेपार्ह मेसेज पाठविल्याप्रकरणी बापू बोरनारे (वय ३0, रा. पाटोदा, ता. येवला) याच्या विरोधात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक लोणारी यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
बोरनारे याने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याची लोणारी यांनी तक्रार केली असता, शहर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (अ) प्रमाणे बोरनारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आली. न्यायालयाने बोरनारे याची जामिनावर सुटका केली. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक डेरे करीत आहेत.
दरम्यान तालुक्यामध्ये सोशलमिडीया द्वारे अंधाधुंद पध्दतीचे मेसेज फिरत असल्याची चर्चा आहे.