येवला (प्रतिनिधी) - विश्वशांतीसाठी प्रार्थना व मानवेतचा संदेश देत
शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. लक्कडकोट परिसरातील ईदगाह
मैदान येथे सकाळी साडेनऊ वाजता सामूहिक नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी
एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ना.जि.म बँकेचे संचालक
माणिकराव शिंदे, म्हाडाचे विभागीय अध्यक्ष नरेंद्र दराडे, संभाजी पवार
,नगरसेवक प्रदिप सोनवणे,दिपक लोणारी,राजकुमार लोणारी यांनीही मुस्लिम
बांधवांना शुभेच्छा दिल्या.
मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी तहसीलदार शरद मंडलीक ,नगरपालिकेचे
मुख्याधिकारी डॉ.मेनकर, आदी उपस्थित होते
प्रेम आणि बंधुभावाचे प्रतीक असलेल्या ईद सणानिमित्त शहरातील विविध
मशिदीत नमाज अदा करण्यात आली. लक्कडकोट ईदगाह मैदान येथे नमाज अदा केली.
त्यानंतर शहर काजी रफिओद्दिन यांनी परमेश्वरा सर्वांना आशीर्वाद दे.
सर्व धर्मीयांत बंधुभाव ठेव. देशाची अखंडता व शांतता कायम ठेव, असे म्हणत
विश्वशांतीसाठी प्रार्थना केली.
पावसाच्या वातावरणामुळे शहरातील बहुतेक मुस्लिम बांधवांनी मशिदीमध्ये
नमाज अदा केली.
शहरात ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देणारे डिजिटल बोर्ड
लावण्यात आले होते. शहरातील पुर्व भागात ईदनिमित्त उत्साहाचे वातावरण
होते.
नवीन वस्त्र परिधान करुन अबालवृद्धांनी गळाभेट घेवून एकमेकांना शुभेच्छा
दिल्या. तसेच मित्रपरिवारांना शिरखुर्मा व फराळासाठी निमंत्रित केले
होते. मिष्ठान्न पदार्थ, मावा, सुकामेवा, दूध, सेवया आदी साहित्याची
मोठय़ा प्रमाणात विक्री झाली. यावेळी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला
होता.