येवला - विहिरीसाठी घेतलेल्या तीन गुंठे जमिनीच्या सात - बारा
उतार्यावरील इतर हक्कांतील नावे कमी करण्यासाठी फिर्यादीच्या बाजूने
निर्णय लावण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील उपविभागीय
अधिकारी रामसिंग हिरालाल सुलाणे आणि खासगी व्यक्ती मयूर अरुण गुजराथी
यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून गजाआड केले.
नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील मोतीराम वामन बोळीज यांनी विहीर
खोदण्यासाठी तीन गुंठे जागा खरेदी केली होती. या जमिनीच्या सात - बारा
उतार्यावर बोळीज यांच्या चुलत भावाचे नाव लागलेले होते. चुकीची सात -
बार्यावरील नोंद रद्द करण्यात यावी, यासाठी नांदगाव तहसीलदार यांच्याकडे
अर्ज सादर करण्यात आला होता; परंतु नांदगाव तहसीलदार यांनी त्यांच्या
विरोधात निकाल दिला होता, त्यामुळे त्यांनी प्रांताधिकारी येवला
यांच्याकडे अपील दाखल केले होते. बोळीज यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी
प्रांताधिकारी सुलाणे यांनी पंधरा हजारांची मागणी केली होती. याबाबत
त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधल्याने ही कारवाई करण्यात
आली. ही रक्कम आज सायंकाळी खासगी व्यक्ती मयूर गुजराथी याने स्वीकारली
असता त्यास रंगेहाथ पकडण्यात आले, तर प्रांत सुलाणे यांनाही ताब्यात
घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला.
घरावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांच्या हाती काही लागले किंवा नाही, याबाबत
माहिती मिळू शकली नाही. ही कारवाई निरीक्षक मुकुंद देशमुख, शिपाई नंदू
बहिरम, महेश नांदुर्डीकर, विकास कंदीलकर आदींच्या पथकाने केली. याप्रकरणी
रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू होते.