येवला मर्चंटस बँकेच्या अध्यक्षपदी पंकज पारख


येवला - (अविनाश पाटील)येवला
येथील येवला मर्चंटस को-ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी पंकज पारख यांची, तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक सुधीर गुजराथी यांची अविरोध निवड करण्यात आली.
बँकेच्या सभागृहात दुपारी 12 वाजता ज्येष्ठ संचालक सुशीलचंद्र गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा बोलविण्यात आली होती. डॉ. राजेश पटेल, मंदाताई तक्ते यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदांच्या निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी बँकेचे संचालक तथा नगरसेवक पंकज पारख यांच्या नावाची सूचना संचालक धनंजय कुलकर्णी व डॉ. राजेश पटेल यांनी मांडली, त्यास संचालक दिनेश आव्हाड व महेश काबरा यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्षपदासाठी सुधीर गुजराथी यांच्या नावाची सूचना डॉ. राजेश पटेल यांनी मांडली, अनुमोदन संचालक राजेश भांडगे यांनी दिले. दोन्ही पदांसाठी एक-एक अर्ज आल्याने त्यांची निवड अविरोध झाल्याचे ज्येष्ठ संचालक सुशीलचंद्र गुजराथी यांनी घोषित केले. या वेळी अध्यक्ष पंकज पारख व उपाध्यक्ष सुधीर गुजराथी यांचा सत्कार करण्यात आला.
बँकेचे व्यवस्थापक मदनलाल चंडालिया यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी माजी संचालक विजयकुमार र्शीर्शीमाळ, संचालक धनंजय कुलकर्णी, संचालक मनीष काबरा आदी उपस्थित होते
थोडे नवीन जरा जुने