येवला (अविनाश पाटील ) शनीवार दि १ मार्च ला येवला तालुक्यातील
राष्ट्रवादीच्या रास्तारोकोवर सगळेच विरोधक तुटुन पडले आहे.
शिवसेनेपाठोपाठ आम आदमी पार्टीच्या भागवत सोनवणे यांनीही आंदोलकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनाबद्दल जनतेमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. वास्तविक पाहता ना.छगन भुजबळ यांनी उमेदवारी स्विकारताना नापसंती दाखवलयाचे दिसून येत नाही. तालुक्यात भुजबळच राहतील असेही ते अनेकदा जाहीरपणाने नमुद करीत आलेले आहे.राष्ट्रवादीच्या या आंदोलनाला हजर असलेल्यांचा समीर भुजबळ यांच्यावर विश्वास नाही का ?. ज्या येवला तालुक्याने आपल्याला अडचणीत साथ दिली
त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याइतके भुजबळ कृतघ्न नाही.आजच्या स्वार्थी
युगात पुतण्याला पुत्रवत प्रेम देणारे दुर्मीळ उदाहरण म्हणून जनतेत
त्यांची प्रतिमा आहे. नाशिकला गेले तरी येवल्याकडे ते लक्ष देतीलच याची खात्री सामान्य जनतेला आहे. समीर भुजबळांनी नाशिक ला विकास केला आहे.त्यांची कारकिर्द इतर कोणत्याही खासदारांपेक्षा चांगली असल्याचे दिसून येते. या आंदोलकानी शरद पवार यांच्याही विरोधात घोषणा दिल्या त्याचीही चर्चा आजही जनतेत आहे. तालुक्यातील दोन प्रमुख नेते आपल्या कार्यकर्त्यांना का घेऊन आले नाही.त्यांच्या मागे कोणीच कार्यकर्ते नाही का ? कारण उपस्थितांची संख्या किती होती हे सगळ्यांनाच दिसून आले. आणि
उपस्थितापैकी ६० ते ७० टक्के आंदोलक भटक्या विमुक्त चे नविन च झालेले अध्यक्ष शरद राऊळ यांचे होते. हे आंदोलन करण्याची प्रेरणा कोणाची ? असे अनेक प्रश्न जनतेपुढे या निमित्ताने उभे राहीलेले आहे. या आंदोलनावर जहरी टिका करताना आम आदमी चे येवला विधानसभा संयोजक भागवत सोनवणे यांनी खुप प्रश्न उपस्थित केले.गेल्या १० वर्षात जनतेच्या प्रश्नावर एकदा ही आवाज न उठवणारे अचानक रास्ता
रोको करतात व वैयक्तीक लाभासाठी रस्ता अडवून परीक्षेच्या काळात विद्यार्थी, सामान्य व्यापारी व जनतेला वेठीस धरतात...पाण्यावाचून मरणारे शेतकरी जेव्हा पाच पाच दिवस मुला बाळांसह , जनावरांसह उपोषण करतात, तेव्हा तालुक्यातील एकही लोक प्रतिनिधी तिकडे फिरकत नाही. कायदेशीर गर्दीला बेकायदेशीर ठरवून उचलून नेण्याची धमकी पोलिस आणि प्रशासनाकडून दिली जाते. पालखेड कालव्या वरील ४६ ते ५२ चारी आठमाही करा अशी मागणी करणारयांना शेतकर्यांना महिलां सकट अटक केली जाते, बियाणे रास्त भावात द्या अशी मागणी करणार्यांच्या पार्श्व भागावर चामडी देखील शिल्लक ठेवली जात नाही. एवढी दहशत असणार्या येवल्यात सत्ताधारी दिड तास भाडोत्री आंदोलक आणून रास्ता रोको करतात .हे सर्व केवळ आपली ठेकेदारी आणि अवैध दूकानदारी वाचविण्यासाठी सूरू आहे .पक्षाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी येवल्यातील कालच्या रास्ता रोको बददल आपली भूमिका मांडली.येवल्यात एकी कडे शासनाच्या आहे त्या योजना नीट राबवता येत नाही म्हणून सामान्य जनतेला रोजच उपोषण, मोर्चे काढावे लागतात त्या वेळी सत्ताधारी म्हणून चिडीचूप बसणारे ठेकेदार आणि लाभार्थी केवळ व्यक्ती निष्ठा दाखविण्यासाठी , पक्षांतर्गंत कुरबरीसाठी जनतेला, पोलीसांना आणि प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरतात...येवल्याची अवस्था आंधळ दळतयं आणि कुत्रे पिठ खातंयं अशी झाली असून राजकीय पक्ष आता सामान्यांचे उरले नसून ते आता लाभार्थ्यांचे,लाचारांचे आणि ठेकेदारांचे पक्ष झाले असल्याची जहरी टिका राष्ट्रवादी चे नाव न घेता आम आदमी चे येवला विधानसभा संयोजक भागवत सोनवणे यांनी केली आहे.
येवल्यात लाचारीचा आणि लाळ घोटेपणाचा कळस झाला असून आमदारकी लढवलेले जुने
जाणते नेते आता जि.प.च्या उमेदवारी साठी आपल्या वयापेक्षा २० वर्षाने कमी असलेल्या वरिष्ठांच्या पायाशी लोटांगण घेतात, त्यांना १५० लोकांच्या लाइन मध्ये उभे अपमानित करून उभे केले जाते.नाक झाकून बुक्यांचा मार दिला जातो अशा येवल्यातील स्थानिक पुढार्यांची आ बैल मुझे मार ही अवस्था
केवळ त्यांना मिळत ठेकेदारीतून मिळत असलेल्या भ्रष्ट संपत्ती मुळेच होत असून सर्वच प्रस्थापितांचे राजकीय अधःपतन झाले आहे. आपला स्वाभिमान प्रस्थापितांनी नेमका कुठे गहाण टाकला आहे ? असा सवाल सोनवणे यांनी केला.
येवला आपचे गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन -
रास्तारोको मध्ये उन्हात तापलेला पेट्रोलचा टॅंकर गर्दी मध्ये अडवून उपस्थित लोकांचा जीव धोक्यात घालणार्या व कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्या, सर्व आंदोलकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी
मागणी आम आदमी चे संयोजक भागवत सोनवणे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांचे कडे फॅक्स द्वारे केलेल्या निवेदनात केली आहे.योग्य कारवाई न झाल्यास आम आदमी न्यायालया कडे दाद मागून पोलिसांना गुन्हे दाखल करण्यास भाग पाडेल असेही निवेदनात म्हटले आहे.