येवला - (अविनाश पाटील) राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यातर्फे केलेले
रास्ता रोको आंदोलन व बंद हे बेकायदेशीर असून राष्ट्रवादी पक्षाच्या
अंतर्गत गोष्टीकरीता येवलेकरांना वेठीस धरणे चुकीचे आहे. परिक्षा
कालावधीत विद्यार्थ्यांचे या आंदोलनामुळे नुकसान झालेले असून या
पदाधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करावी अशी मागणी येवला
तालुका शिवसेना प्रमुख झुंजारराव देशमुख यांनी येवला प्रांताधिकारी
रामसिंग सुलाणे यांच्याकडे केली आहे. यावर कार्यवाही न झाल्यास शिवसेना
तीव्र आंदोलन झेडेस असाही इशारा देणेत आला आहे.
प्रांताना दिलेल्या निवेदनावर शहर संघटक धिरजसिंह परदेशी, शहराध्यक्ष
राजकुमार लोणारी, माजी तालुकाप्रमुख भास्कर कोंढरे ,रुपेश लोणारी, महेश
सरोदे,भागीनाथ थोरात,दिपक भदाणे,चंद्रकांत शिंदे,अभिजीत देशमुख,फिरोज
शेख, नितीन संसारे,समसु पठाण, रशीद शेख,राजाभाऊ नाईकवाडे,राकेश
शिंदे,गणेश पेंढारी,साजीद गणी शेख,चंद्रमोहन मोरे,सुभाष शिरसाठ आदींच्या
सह्या आहेत.निवेदनाच्या प्रती मा.गृहमंत्री व जिल्हाधिकारी यांना
पाठवल्या आहेत.