आम आदमीचे महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी मंगळवारी येवला तालुक्यात मेळावा घेणार

येवला (अविनाश पाटील) तालुक्यातील आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यांना
मार्गदर्शन
करणायासाठी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी येवल्यात येत असून
कार्यकर्ता मेळावा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवार
दि.१८/२/२०१४ रोजी आयोजित केला आहे. सकाळी ११ वाजता मेळाव्यास सुरूवात
होईल..या मेळाव्यासाठी मेटा चे माजी चिफ इंजिनियर विजय पांढरे, प्रदेश
सदस्य संजीव साने,शेतकरी नेते रघुनाथ पाटील, आदि पदाधिकारी शहरात येत
आहेत. मेळाव्याच्या दिवशी सदस्य नोंदणी होणार असून प्रदेश
पदाधिकारयांच्या वतीने पक्षात प्रवेश करणार्‍यांचे स्वागत करण्यात येणार
आहे. नाशिक जिल्हा समन्वयक अॅड प्रभाकर वायचळे, जिल्हा सचिव मुकुंद बेनी,
जिल्हा खजिनदार सुरेश शिंदे आदि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची
माहिती भागवत सोनवणे यांनी दिली आहे.
सदर मेळाव्यास अंदाजे १५०० निवडक शेतकर्याना निमंत्रीत करण्यात आले आहे.
या वेळी तालुक्यातील प्रलंबीत सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासाठी ठोस भुमिका
घेत पक्षाची पुढील वाटचाल ठरविण्यात येणार आहे...उपस्थित शेतकर्यांना
शेती सिंचन,जलनियोजन,जलसाक्षरता, पंपासाठी लागणारी अखंडीत विद्युत
पुरवठा, हमी बाजार भाव, या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे तसेंच २१
व्या शतकातील शेती पुढील आव्हाने या संबधी चर्चा सत्र आयोजित करण्यात आले
आहे. प्रचलित राजकारणात सत्ताधारी आणि त्यांच्याशी हातमिळविणी करणारे
प्रस्थापित विरोधी पक्ष यांच्या मुळे राजकारणा कडे बघण्याचा समाजाचा
दृष्टीकोन बदलला असून राजकारण म्हणजे भ्रष्टाचार असेच समिकरण झाले
आहे..तरूणांचा निवडणूकी पूरता केला जात असून त्यांच्या हाती निव्वळ
झेंडे,दांडे आणि बाटल्या देऊन तरूणाईला लाचार बनविले जात आहे..या
पार्श्वभूमिवर आम आदमी पार्टी डोक्यावर टोपी आणि आणि हातात झाडू घेवून
भ्रष्टाचार साफ करण्याचा प्रयत्न करत असताना शेतकरी, कष्टकरी,विणकर,
मजुर, यांच्या प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्याचे प्रयत्न करणार आहे.
थोडे नवीन जरा जुने