येवला - (अविनाश पाटील) शहरातील विंचूर चौफुली भागातील सन इन्फोटेक या
संगणक विक्री व दुरुस्ती दुकानाचे छताचा पत्रा वाकवून आतील शटर फोडून
सुमारे १ लाख १५ हजार किमंतीचे लॅपटॉप व इतर ऐवज अज्ञात चोरट्यांनी
चोरल्याची घटना घडली. मंगळवारी रात्री ९ वाजता दुकान बंद केल्यावर आज
सकाळी ९.३० वाजता दुकान उघडले असता सदरचा प्रकार उघडकीस आला.
याबाबत सदरचे दुकानमालक हुसेन अली असगर लाकडवाला यांनी शहर पोलिसांत
फिर्याद दिली आहे. याबाबत शहर पोलिसांनी अज्ञात चोरांविरुध्द चोरीचा
गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो.नि. रणजीत डेरे यांच्या
मार्गदर्शनाखाली शहर पोलिस करीत आहे.