गाय चोरीच्या संशयावरून मारहाण करुन खुन केल्याचा आरोप

येवला (अविनाश पाटील) शहराुपासून चार कि.मी अंतरावर असलेल्या रायते येथे
गाय चोरल्याच्या संशयावरून मुलगा सद्दाम करिम पठाण वय. ३० या स जीवे ठार
मारल्याची फिर्याद सद्दामची आई दगूबाई करिम पठाण (रा.रांजणगाव ता.राहता
जि.अ.नगर) यांनी शहर पोलिसांत दिल्याने या प्रकरणी शहर पोलिसांनी चौघाना
अटक केली आहे. सदरची घटना आज सकाळी सहा वाजेच्या दरम्यान रायते. ता.येवला
येथे घडली.
दरम्यान गाय चोरी गेल्याची फिर्याद विठ्ठल एकनाथ चव्हाण वय.५० रा.रायते
यानी शहर पोलिसांत दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रायते गावातील राहत्या घरी असताना
त्यांच्या घरावर व दरवाजावर दगडे मारून दरवाजा तोडून आत प्रवेश करून
फिर्यादीचा मुलगा सद्दाम करिम पठाण यास गाय चोरल्याच्या संशयावरून मारोती
उर्फ संदिप विठ्ठल चव्हाण , विठ्ठल एकनाथ चव्हाण ,ज्ञानेश्वर जगन्नाथ
बनकर, सतिष उर्फ बंडू तुकाराम मढवई व इतर सर्व राहणार रायते.ता.येवला
आदींनी साखळी ,काठी व गजाने मारहाण करुन सद्दाम यास जीवे ठार मारले अशी
फिर्याद त्याच्या आीने शहर पोलिसांत दिली. सकाळी पोलिसांनी घटनास्थळी भेट
दिली व पाहणी केली. सद्दाम जखमी अवस्थेत असताना त्यास प्रथम येवला
ग्रामिण रुग्णालयात त्यानंतर अधिक उपचारार्थ नाशिक जिल्हा रुग्णालयात
घेऊन जात असताना मयत झाला. पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे.
सदर संशयीतावर भादंवि ३०२,४५२,४२७, ३४ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला
आहे.
दरम्यान आज पहाटे ४ वाच्या सुमारास ४५ हजार रुपये किंमतीची जर्शी गाय
चोरीला गेल्याची फिर्याद विठ्ठल एकनाथ चव्हाण रा.रायते.ता.येवला यांनी
पोलिसांत दिली. मोटारसायकल क्रं एम.एच.२०- ए.झेड. १७९६ वरील चालक व
त्याच्या जोडीदार विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलिस
प्रमुख संजय मोहिते, पो.उपअधिक्षक नरेश मेघराजानी यांनी घटनास्थळी भेट
देऊन पाहणी केली. याबाबत अधिक तपास पो.उ.नि. पी.एन खेडकर करीत आहे.
थोडे नवीन जरा जुने