येवला (अविनाश पाटील)- तालुक्यातील पिंपळगाव जलाल ते येसगाव शिवार वाहतूक
रस्ता क्र. ३२२ वरील हॉटेल बांधकाम व शेतकर्यांनी केलेले अतिक्रमण
काढण्यासंदर्भात गेल्या ९ महिन्यांपासून ग्रामपंचायतीपासून ते पालकमंत्री
छगन भुजबळ यांच्यापर्यंत वेळोवेळी निवेदने देऊनही कोणतीही कारवाई होत
नाही म्हणून ग्रामस्थांनी १८ फेब्रुवारी रोजी मंगळवारी सकाळी १0 वाजता
नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करणार आहे. तसेच
येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याबरोबरच निवडणूक
प्रचारासाठी गावात फिरकू देणार नाही, असा सज्जड दमच ग्रामस्थांनी ना.
भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.रस्ता क्र. ३२२ हा म. गांधी
रोजगार हमी योजने अंतर्गत सुमारे १0 लाख ३४ हजार रुपये खर्चासाठी मंजुर
असूनही गट नं. १८४ मध्ये जुनेद सिद्दीकी यांनी हॉटेल बांधकाम करुन
रस्त्यावर अतिक्रमण केल्याने सदर रस्त्याचे काम न झाल्याने शेतकर्यांची
मोठय़ा प्रमाणात गैरसोय झाली आहे.आश्वासन देऊनही रस्ता मोकळा करून दिला
नाही, असे निवेदनात म्हटले आहे. ग्रामपंचायती कडून हॉटेल परवानगी न घेता
अटी शर्ती १२ मीटर रस्ता सोडून बांधकाम करण्याचे जुनेद सिद्दीकी मुमन
यांनी मान्य केलेले असूनही हॉटेल बांधकाम करुन अतिक्रमण केले आहे.याबाबत
शासकीय अधिकार्यांशी अतिक्रमणाबाबत चौकशी केली असता उडवा उडवीचे उत्तर
दिले जाते. याप्रकरणी ग्रामस्थांनी १८ तारखेला रास्ता रोको आंदोलनाचा
निर्णय घेतला आहे. निवेदनावर सरपंच राजेंद्र पवार यांच्यासह असंख्य
ग्रामस्थांच्या स्वाक्षर्या आहेत.