येवला -(अविनाश पाटील) स्वामी विवेकानंदाच्या १५० व्या जयंतीनिमित्त
भारतात आठ महिन्यांपासून सुरु असणाऱ्या जयंती महोत्सव रथयात्रेचे आगमन
बुधवारी येवला शहरात झाले . रथयात्रेचे स्वागत विंचूर चौफुलीवर
नगराध्यक्ष निलेश पटेल,बाळासाहेब लोखंडे यांनी केले. शहराच्या मुख्य
भागातून रथयात्रा टिळक मैदानात आली असता रामकृष्ण मठाचे स्वामी
बुध्दानंदजी यांनी आपले विचार उपस्थितासमोर मांडले . भारतीय समाज
भोगवादाच्या विळख्यात अडकत चालल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
स्वामी विवेकानंदांनाही भारतीयांच्या या स्थितीचा प्रत्यय त्या काळात
आला होता. यामागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी स्वामीजी भारतभ्रमणासाठी
बाहेर पडल्याचेही ते म्हणाले. परकीय आक्रमकांकडून भारतीय तत्त्वज्ञान
आणि अध्यात्मवार हेतूपुरस्सर प्रहार केले जात आहेत व त्यावरच भारताच्या
पिछेहाटीचे खापर फोडले जात आहे, हे स्वामीजींच्या लक्षात आले. त्यानंतर
वेदोपनिषीदांमधून आलेल्या तत्त्वज्ञानाचा प्रवाह स्वामीजींनी
पुनरुज्जीवीत केला.ब्रिटीशांनी भारतात हेतूपुरस्सर पेरलेला भोगवाद
आपल्या व्यवस्थेने अद्यापही स्वीकारलेला आहे. हे आपणही निमूटपणे
स्वीकारतो, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. जगाच्या नैतिकतेचा
पाया बनण्यासाठी तुम्ही समाजाच्या कोणत्याही क्षेत्रात आणि कोणत्याही
स्थितीत असा पण, अध्यात्म अन् राष्ट्रकार्याची कास धरा, असे आवाहनही
स्वामी बुद्धानंद यांनी केले.येवल्यात ही यात्रा थांबून १५ फेब्रुवारीला
धुळ्याकडे जाणार आहे.