मांजरपाडा वळण बंधार्‍याचे काम तात्काळ सुरू करा : अशोक संकलेचा

येवला(अविनाश पाटील) - येवला तालुक्याच्या शेती सिंचनासाठी वरदान
ठरणार्‍या मांडरपाडा वळण बंधारा (क्र.१) चे काम तात्काळ हाती घ्यावे;
अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मांजरपाडा कृती समितीचे
अशोक संकलेचा यांनी दिला.
कासारखेडे येथे आयोजित कृती समितीच्या मेळाव्यात अशोक संकलेचा बोलत होते.
अध्यक्षस्थानी आप्पासाहेब कदम होते. संकलेचा पुढे म्हणाले, ना. छगन भुजबळ
यांनी मांजरपाडा प्रकल्प एकसाठी केंद्र व राज्यशासनाकडे पाठपुरावा करून
निधी उपलब्ध केला. तसेच काम प्रगतीपथावर पोहचविले आहे, मात्र
मंत्रीमंडळातील काहींना हे काम मान्य नसल्याने बंद पाडल्याचा आरोप
त्यांनी केला. सदरचे काम तात्काळ सुरू करावे; अन्यथा कृती समितीच्या
वतीने पुढील सप्ताहात आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल असेही त्यांनी
सांगितले. कदम यांनीही गेल्या तीन महिन्यांपासून बंद पडलेले काम पूर्ववत
सुरू करण्याची मागणी केली. याप्रसंगी माजी सभापती विठ्ठलराव शेलार,
तात्या लहरे, पुंडलिक कवटे, संजय पेढारी, संजय पाटील, धनंजय कुलकर्णी,
अनिस पटेल आदींची भाषणे झाली. मेळाव्यास गोकूळ चव्हाण, कौतिक पगार,
वाल्मिक पुरकर, बाळासाहेब शेटे, अरूण शिरसाठ, सोपान सैंद, लक्ष्मण कदम,
कांतिलाल खैरनार, धोंडीराम कुर्‍हाडे आदींसह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने
उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने