खटपट युवा मंचतर्फे आरोग्य जागरुकता शिबीर संपन्न

येवला - येथील खटपट युवा मंच व भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्र नाशिक
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य जागरुकता व शिक्षण कार्यक्रम या
उपक्रमांतर्गत लहान मुलांचे आरोग्य व लसीकरण व इतर आजारांवर मार्गदर्शनपर
शिबीराचे उद्घाटन सावरगांव येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. सुरेश कांबळे
यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. या प्रसंगी डॉ.सुरेश कांबळे
यांनी लसीकरणाचे महत्व उपस्थित महिलांना पटवून दिले तर डॉ.यशवंत खांगटे व
डॉ.संतोष जाधव यांनी समतोल आहार व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नर्सिंग स्कुल वार्डन सुचिता जाधव, शिंपी
समाजाचे चिटणीस रमेश भांबारे, सोमनाथ लचके हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन नईम मनियार यांनी केले तर आभार
खटपट मंचचे अध्यक्ष मुकेश लचके यांनी मानले.यावेळी शहरातील महिला व मुले
मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष
टिभे,तृषार भांबारे,ज्ञानेश टिभे,पंकज शिंदे, अक्षय पोंदे,अमोल लचके,जीवन
भांबारे मयूर हाबडे आदीसंह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
थोडे नवीन जरा जुने