स्वातंत्र्यानंतर प्रथमच दुगलगावकरांना झाले बसचे दर्शन

येवला - स्वातंत्र्यानंतर प्रथमच दुगलगावच्या नागरिकांना सोमवारी दर्शन  झाले. त्यामुळे 2013 चा शेवट गोड झाला अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून
व्यक्त केली जात होती. बससेवा सुरू झाल्यामुळे गावातील विद्यार्थी व प्रवाशांची दोन किलोमीटरची पायपीट थांबणार आहे. तालुक्याच्या पूर्व भागात बोकटे गावापासून चार किलोमीटर अंतरावर दुगलगाव
आहे. गावची लोकसंख्या 1100 असून, गावातील अनेक राजकीय नेत्यांनी मतदारसंघाचे, तर काहींनी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे प्रतिनिधित्व
केले. तरीही गावात 2013 च्या शेवटपर्यंत बस येऊ शकली नाही, त्यामुळे लोकप्रतिनिधीविषयी नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. बससेवेअभावी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते 40 विद्यार्थ्यांना दुगलगावपासून दोन
किलोमीटर अंतरावरील काराच्या माथ्यावर पहाटे 5 वाजता पायपीट करीत, बस पकडावी लागते. आता सोमवारपासून बससेवा सुरू झाल्याने त्यांची पायपीट थांबणार आहे.
गावात बसचे प्रथमच दर्शन झाल्याने मनसे पदाधिकार्‍यांच्या वतीने आगार व्यवस्थापक भगवान जगनोर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मनसेचे जिल्हा सरचिटणीस रामदास लासुरे, शहराध्यक्ष गौरव कांबळे, तालुका संघटक नकुल घागरे, विद्यार्थी सेनेचे विजय निकम, चेतन फुलारी, शैलेश कर्पे आदींसह
ग्रामस्थ उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने