धडपड मंचच्या बडबड गीत स्पर्धेत चिमुकल्यांनी सादर केले संस्कृत श्लोक........

येवला - बालकांच्या अंगी मंचावर जाण्याचे धारीष्ट्य यावे व त्यांचे कौतुक व्हावे म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही धडपड मंच तर्फे महालक्ष्मी मंदीर हॉलमध्ये बडबड गीत स्पर्धा उत्साहात घेणेत आली. सुमारे १५० बालकांनी या स्पर्धेत भाग घेतला. मराठी ,हिंदी,इंग्रजी गाण्याच्या बरोबरच संस्कृत श्लोक मोठ्या धिटाईने या चिमुकल्यांनी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
या वेळी शहरातील पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रत्येक स्पर्धकास खाऊ व खेळणी भेट म्हणून देण्यात आली. शिवाय बावीस स्पर्धकांना
त्यांच्या आवडीप्रमाणे खेळणी देण्यात आली. यशस्वी बालके पुढिल प्रमाणे १) पुनम विक्रमसिंह परदेशी २) यश विजय कांबळे ३) अनिलसहा खुशिकसहा ४) श्रावणी प्रसाद गुब्बी ५) प्रणाली प्रकाश माळवे ६) सिध्दी मधुकर सातपुते ७) सिध्दी सचिन बाकळे ८) खुशी अजय पहाडी ९) चेतना प्रमोद मराठे १०) हर्षदा राकेश भांडगे ११)साईश गणेश सोनवणे १२) समर्थ संजय शेंद्रे १३) नक्षत्रा दशरथ चांदणे १४) आदित्य गणेश सासे १५) प्राप्ती योगेश माळोकर १६) कृष्णा राहुल सुताने १७) अपेक्षा मंगेश पैठणकर १८) श्रेयसी गणेश काळंगे १९) सार्थक संदिप शिंदे २०) ग्रीष्मा रितेश गुजराथी २१) भूमि राकेश मांजरे कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.खांगटे यांनी केले. परिक्षक म्हणून नईम मनियार सर यांनी काम पाहिले. प्रास्ताविक व आभार प्रभाकर झळके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाकर अहिरे, मुकेश लचके,दत्ता कोटमे,मयुर पारवे, रमाकांत खंदारे, मंगेश रहाणे,संतोष खंदारे व ललित ठोंबरे यांनी मेहनत घेतली.
थोडे नवीन जरा जुने