येवला - कांद्याला उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव मिळावा या मागणीसाठी आ.पंकज भुजबळ व आ.जयवंतराव जाधव यांनी विधिमंडळात गळ्यात कांद्याची माळ घालून सभागृहाचे लक्ष वेधले.कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चाइतकेही दाम मिळत नाही.कांद्याच्या दारात नेहमीच चढ उतार होत असते. त्यामुळे कांदा पिकाला राज्य सरकारने तीन हजार रु हमी भाव देवून कांदा खरेदी करावा अशी मागणी आ.पंकज भुजबळ आणि आ.जयवंतराव
जाधव यांनी केली. कांद्याचे निर्यातमूल्य केंद्राने कमी केल्यामुळे कांद्याची बाजारातील स्थिती सुधारण्यास मदत होईल त्यामुळे आ.जाधव यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. या मागणीची विधानपरिषदेच्या सभापतींनी कृषी आणि पणन मंत्र्यानी तातडीने दाखल घ्यावी असे निर्देश दिले.