येवला- नाशिक जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील येवला तालुक्यातील निमगाव मढ हे तालुक्यापासून ९ किमी लांब गावातील एका मागासवर्गीय कन्येने पायलटहोऊन गगन भरारी घेतली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तीने घेतलेली भरारी ही भारतातील तरुणीसाठी आदर्श ठरलेली आहे. ज्या गावात गेले कित्येक वर्षापासून एसटी जात नाही अश्या गावातून ६ किमी पायपीट करून तीने रंवदे ता. कोपरगाव येथे जाऊन तेथून पुन्हा एसटीने कोपरगावला जाऊन ११-१२ वी शिक्षण पुर्ण केले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातील शाळेत पुर्ण केले.निमगाव मढ गावातील पुंजाराम व हौशाबाई खळे या दलित कुटुंबातीलशेतकर्याच्या घरात जन्मलेल्या निर्मलाचे स्वप्न तिला स्वस्थ बसू देत नव्हते. पायलटचे प्रशिक्षण घेण्यासाठी भरारी पाहण्याचे स्वप्न पाहत राजीव
गांधी विंग्स एव्हीएशन येथे पायलट साठी अर्ज केला . त्यासाठी लागणाऱ्या
फी साठी समाज कल्याण अंतर्गत असलेला कोठ्यातून शिष्यवृत्ती साठी तीने
अर्ज केला. पण तो नामंजूर झाल्याने तीच्या वडिलांनी गावातील
गावकर्यांच्या कानी ही गोष्ट सांगितल्यावर पंचायत समितीचे माजी सभापती
कारभारी लभडे, सयाराम लभडे, संतोष लभडे आदींनी पालकमंत्री छगन भुजबळांची
भेट घेत शिष्यवृत्तीसाठी साकडे घातले. आणि भुजबळांच्या प्रयत्नाने
फाइलीही पटापट सरकल्या. 27 लाख 29 हजारांची शिष्यवृत्ती अखेर निर्मलाला
मंजूर झाली. आणि २०१० ते २०१३ या कालावधीमध्ये तीने हैद्राबाद येथे
प्रशिक्षण पुर्ण करीत २०० तास प्लाईक कोर्स पुर्ण केला . सी-१५२ व सी १७२
एकरक्राफ्टचा अभ्यासक्रम तीने पुर्ण केला.
या गावात १५ वर्षापुर्वी येवला-पारेगाव-निमगाव-रंवदा अशी बससेवा होती
कोपरगावातील रंवदा पंचक्रोशीतील ग्रामिण जनता तसेच या गावातील जनतेला या
सेवेपासून वंचीत राहावे लागत आहे. या गावातील अनेक मुली बससेवा
नसल्यामुळे उच्चशिक्षणाला वंचीत राहत आहे. गेले कित्यक वर्षांपासून खराब
रस्त्यामुळे ही बससेवा बंद आहे.
भुजबळांच्या प्रयत्नामुळे तीला ही संधी मिळाली . ना.भुजबळाच्या
सहकार्याने हे घडले पण......... इतरही ठिकाणी अशा अनेक निर्मला आहेत
त्यांचे काय ? समाजकल्याण विभागामधील कारभाराने अशा अनेक निर्मला आपल्या
स्वप्नपुर्तीपासून दूर राहीलेल्या असण्याची शक्यता आहे. समाजकल्याण
विभागाच्या शिष्यवृत्ती गरजूना मिळण्यासाठी पारदर्शकता हवी असल्याचे मत
जाणकार व्यक्त करीत आहे.