येवला - चुलत मामाने आपल्या तीन वर्षाच्या भाचीवर अत्याचार
करून मारहाण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी येवला पोलीस
ठाण्यात नराधम मामाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक
करण्यात आली आहे. विशाल विजय गळीतकर (वय २५, रा. राऊळ वस्ती, येवला) असे त्या नराधम मामाचे नाव आहे. ६ डिसेंबर रोजी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने तीन वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केला, तसेच जबर मारहाणही केली. बालिकेच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्याने पीडितेच्या काकू ने हा प्रकार बघितला. घटना घडून आठवडा उलटल्यानंतर पीडित बालिकेच्या पालकांनी येवला पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी नराधमास अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी के ली. अधिक तपास उपनिरीक्षक मंगल जोगन करीत आहेत. |